मध्य रेल्वे बददल सांगली जिल्हयात नाराजी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/03/2025 4:14 PM

1] जिल्हा मुख्यालय व महानगर मुख्यालयाच्या सांगली रेल्वे स्टेशनवर नवीन रेल्वे गाड्यांना थांबा मिळत नाही 

2] तालुका स्तरावरील भिलवडी किर्लोस्करवाडी ताकारी जत कवठेमंकाळ रेल्वे स्टेशनवर नवीन रेल्वे गाड्यांना थांबा मिळत नाही

3] सांगली जिल्ह्यातील 21 रेल्वे स्थानकांपैकी फक्त एकाच रेल्वे स्थानकांवर गाड्यांचा थांबा मिळतो त्यामुळे इतर 20 रेल्वे स्थानकांचे भविष्य अंधारात आहे

सांगली रेल्वे स्टेशन व सांगली जिल्ह्यातील इतर रेल्वे स्टेशनवर वारंवार रेल्वे विभागाकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच मोठा आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. सांगली जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी स्वतःच्या आसपास असलेल्या रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्या थांबवण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाऊन लिखित विनंती पत्र द्यावे व त्याची कॉपी सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचला व्हाॅट्सअपने पाठवाववी.

⁉️ *अनेक जिल्ह्यांमध्ये 3 ते 4 रेल्वे स्थानकांवर रेल्वे गाड्यांचा थांबा असतो मग सांगली जिल्ह्यात 4 रेल्वे स्थानकावर का थांबा नाही*

❓ *आणखी किती वर्षे सांगली जिल्ह्यावर रेल्वे कडून अन्याय होत राहील*

नुकत्याच सुरू झालेल्या 6 उन्हाळी विशेष रेल्वे गाड्यांना जळगाव जिल्ह्यामध्ये 4 रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे.

बांदरा-रीवा एक्सप्रेस व रिवा-बांद्रा एक्सप्रेस या 2 रेल्वे गाड्यांना जळगाव जिल्ह्यामध्ये धरणगाव, अमळनेर, जळगाव व भुसावळ या 4 रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

वलसाड-दानापूर एक्सप्रेस व दानापूर-वलसाड एक्सप्रेस या 2 रेल्वे गाड्यांना देखील  जळगाव जिल्ह्यामध्ये धरणगाव, अमळनेर, जळगाव व भुसावळ या 4 रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

राजकोट-महबूबनगर एक्सप्रेस व मेहबूबनगर-राजकोट एक्सप्रेस या दोन्ही रेल्वे गाड्यांना जळगाव जिल्ह्यामध्ये 4 रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

कर्नाटकात जवळपास सर्व रेल्वे गाड्यांना बेळगाव जिल्ह्यामध्ये 3 ते 4 रेल्वे स्टेशनवर थांबा दिला जातो.

🟡 *इतर महानगरपालिका क्षेत्रात 2 रेल्वे स्टेशनवर सर्व रेल्वे गाड्यांना थांबा दिला जातो. फक्त सांगली महानगरपालिका क्षेत्रात सांगली रेल्वे स्टेशनला थांबा न देण्याचा भेदभाव का*

हुबळी-धारवाड महानगर पालिकेतील हुबळी व धारवाड या 2 रेल्वे स्टेशनवर सर्व रेल्वे गाड्यांना थांबा दिला जातो

जामनगर महानगरपालिकेतील जामनगर व हापा या 2 रेल्वे स्टेशनवर सर्व रेल्वे गाड्यांना थांबा दिला जातो.

इंदोर महानगरपालिका क्षेत्रात इंदोर व लक्ष्मीबाईनगर या 2 रेल्वे स्टेशनवर सर्व रेल्वे गाड्यांना थांबा दिला जातो.

जोधपुर महानगरपालिका क्षेत्रात जोधपुर व भगतकीकोठी या फक्त 3 किलोमीटर अंतरावरील 2 रेल्वे स्टेशनवर सर्व रेल्वे गाड्यांना थांबा दिला जातो

बंगळूर महानगरपालिका क्षेत्रात बंगळूर व यशवंतपूर या 6 किलोमीटर अंतरावरील 2 रेल्वे स्टेशनवर सर्व रेल्वे गाड्यांना थांबा दिला जातो.

परंतु उन्हाळ्यात सुरू झालेल्या मैसूर-भगतकीकोठी(जोधपुर) व भगतकीकोठी-मैसूर या 2 रेल्वे गाड्यांना मुद्दामहून सांगली व किर्लोस्करवाडी या 2 महत्त्वपूर्ण रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला नाही. या रेल्वे गाड्यांना इतर 35 रेल्वे स्थानकांवर थांबा आहे. ज्यापैकी बरेच रेल्वे स्थानक सांगली व किर्लोस्करवाडी पेक्षा लहान व कमी उत्पन्न देणारे स्थानक आहेत. 

सांगली व किर्लोस्करवाडी हे सांगली जिल्ह्यात अतिशय महत्त्वाची व चांगले उत्पन्न देणारी रेल्वे स्थानके असून देखील इथे रेल्वेचा थांबा दिला जात नाही.

त्यामुळे रुपये 5 हजार कोटी खर्च करून पुणे-सांगली-लोंढा-बेंगलुरु रेल्वे मार्गाचे दुपद्रीकरण करण्याचा सांगली जिल्ह्याला काय फायदा असा प्रश्न सांगली जिल्ह्यातील नागरिक विचारत आहेत ?

सांगली जिल्ह्यामध्ये 21 रेल्वे स्टेशन असून जिल्हा मुख्यालय व महानगर मुख्यालयाच्या सांगली रेल्वे स्टेशनला रेल्वे गाड्यांचा थांबा मिळत नाही.  तालुका स्तराच्या किर्लोस्करवाडी, भिलवडी, जत, कवठेमंकाळ व ताकारी या रेल्वे स्टेशनला देखील नविन रल्वे गाड्यांचा थांबा मिळत नाही.

🔴 *सांगली जिल्ह्यातील 21 रेल्वे स्टेशनचे भवितव्य धोक्यात*

कोल्हापूर-सोलापूर-कलबुर्गी एक्सप्रेस रेल्वे गाडीला सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा नाही.

 रेल्वे या गाड्यांना पुढे सांगली किंवा किर्लोस्करवाडी पर्यंत विस्तारित करत नाही. 

त्यामुळे सांगली जिल्ह्यातील बहुतांश लोक रेल्वे सेवा पासून वंचित राहिलेली आहे.  सांगली जिल्ह्यात दुपदरी विद्युतीकरण झालेले रेल्वे मार्ग आहेत व 21 रेल्वे स्टेशन आहेत.
पण सांगली जिल्ह्यातील लोकांना रेल्वे सेवाच उपलब्ध नसेल तर या विद्युत दुपदरीकरण झालेल्या रेल्वे मार्गांचा फायदाच काय ? असा सवाल सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केला आहे

सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच तर्फे रेल्वेमंत्री व मध्य रेल्वेच्या पुणे व मुंबई मुख्यालयांना अनेक पत्रव्यवहार करून विनंती करण्यात आली आहे की सांगली जिल्हातील सांगली, किर्लोस्करवाडी, जत कवठेमंकाळ व भिलवडी सारख्या रेल्वे स्टेशनला रेल्वे गाड्यांचा थांबा मिळावा.  या रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाड्या थांबल्या तरच सांगली जिल्ह्यातील लोकांना रेल्वे सेवा उपलब्ध होईल व या रेल्वे स्टेशनचा  विकास होईल.

परंतु वारंवार विनंती केल्यानंतर देखील मध्य रेल्वेचे अधिकारी सांगली सारख्या जिल्हा मुख्यालय व महानगरपालिका मुख्यालयाच्या रेल्वे स्टेशनवरच थांबा देत नाहीत तर इतर रेल्वे स्टेशनचे भवितव्य काय आहे याबद्दल अंधारमय वातावरण आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या