पहलगाम आतंकवादी हल्ल्यातील अँडव्हान्स बुकींग केलेल्या पर्यंटकांचे पैसे परत मिळावेत : नागरिक जागृती मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/04/2025 11:28 AM

प्रति 
मा. नाम. देवेंद्रजी फडणवीस 
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई 

विषय:- पहलगाम येथील आतंकवादी हल्ल्यामुळे आपल्या राज्यातील ऍडव्हान्स बुकिंग केलेल्या प्रवासांच्या आर्थिक नुकसानी बाबत 

महोदय 

नुकत्याच काश्मीर येथील पहलगाम येथे आतंकवादी हल्ला झाला त्यामध्ये 28 निरपराध नागरिकांचा जीव गेला अखंड भारत देश त्याबद्दल दुःख मानत आहे 
आपल्या राज्यातील सुद्धा जे प्रवासी काश्मीरमध्ये अडकले होते त्यांना आणण्यासाठी आपण व आपल्या सहकाऱ्यांनी जीवाचे रान करून सर्व प्रवाशांना सुखरूप परत आणले त्याबद्दल आपले आभार 
मात्र त्याचबरोबर दुर्दैवाने सदर घटलेल्या घटनेमुळे जून पर्यंत राज्यातील हजारो प्रवाशांनी विमानाचे रेल्वेचे खाजगी ट्रॅव्हल्स चे ऍडव्हान्स बुकिंग केलेले आहे तसेच काही ट्रॅव्हल्स एजन्सी कडून काश्मीरमधील हॉटेल्स वाल्यांचे बुकिंग करून त्यांना ऍडव्हान्स रक्कम दिलेले आहेत 
पडलेल्या प्रकारामुळे सर्व यात्रा रद्द झालेले आहेत त्यामुळे ज्यांनी ॲडव्हान्स बुकिंग केले आहे त्या सर्वांचे कोट्यावधी रुपये आर्थिक नुकसान होताना दिसत आहे 
याबाबत ट्रॅव्हल्स एजंटांकडे चौकशी केली असता आम्ही पैसे बुक केले आहेत समोरच्या हॉटेल मालक चालक ट्रॅव्हल्स वाले विमान कंपन्या रेल्वे बुकिंग व खाजगी ट्रॅव्हल्स वाल्यांना पैसे भरलेले आहेत 
सदर पैसे परत मिळतील का नाही याबाबत नागरिकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झालेली आहे याबाबत मदत व पुनर्वसन खात्याच्या मार्फत एक खिडकी योजना राबवून अशा प्रवाशांच्या पैशांच्या बाबत योजना राबवून त्यांना संबंधित यंत्रणे कडून पैसे परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती आहे

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा 


Share

Other News

ताज्या बातम्या