जामखेड ईव्हीएम स्ट्रॉंगरूमसह मतमोजणी केंद्र तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

  • Mr.Ravikumar Shinde (Dhondpargon )
  • Upadted: 18/12/2025 12:56 AM



अहिल्यानगर, दि.१७ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज जामखेड येथील ईव्हीएम स्ट्रॉंगरूम, मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेत आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले.

येथील श्री नागेश्वर सामाजिक सभागृह येथे जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचारी प्रशिक्षण, ईव्हीएम यंत्रांचे वाटप, स्वीकृती याबाबतच्या नियोजनाची माहिती घेतली. तसेच यापूर्वीच्या निवडणुकीतील ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंगरूमची पाहणीही त्यांनी केली. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने मतमोजणी केंद्रावर करण्यात आलेली तयारी, सुरक्षा उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली. यंत्रणांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करावे, असे स्पष्ट आदेश डॉ. आशिया यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अजय साळवे, तहसीलदार धनंजय बांगर, नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, नगरपरिषद निवडणूक विभागाचे मंगेश घोडेकर, स्थापत्य अभियंता आमेर शेख व महेश शेकडे आदी उपस्थित होते.

#Jamkhed #Election2025 #EVMStrongRoom #CollectorReview #Ahilyanagar #ElectionPreparation #MaharashtraElections #VotingProcess #SafetyMeasures

Share

Other News

ताज्या बातम्या