गाडगीळ साहेब व आयुक्त गांधी साहेब कुपवाडला भाजी बाजार पेक्षा कुपवाडचा जो मेन रस्ता आहे तो रुंदीकरणासह हॉट मिक्स डांबरीकरण होणे महत्त्वाचे व गरजेचे आहे.कुपवाडला आठवड्यातून २ वेळा २ ठिकाणी भाजी बाजार भरतो.पण आता मेन रस्त्याची दुर्दशा झाली आहे त्या कडे कोणाचे ही लक्ष नाही.
मिरज रस्ता कमान ते विजयनगर कोपऱ्या पर्यंत रस्ता ट्रिमिक्स झाला आहे पण तेथून पुढे लक्ष्मीनगर पर्यंत रस्ता फारच खराब असून आता पावसाळ्यात ठीक ठिकाणी पाणी राहून अपघाताचे प्रमाण वाढणार आहे.
सुतगिरणी ते लक्ष्मी देऊळ पर्यंत रस्ता मंजूर झाला आहे असे समजते पण मग सुतगिरणीच्या खालील रस्याचे काय करणार ते स्पष्ठ करावे. का तो रस्ता तसाच सोडून कुपवाड करांचे हाल करायचे ठरले आहे काय? त्याला निधी का मंजूर नाही? हा रस्ता पण कुपवाड मध्येच आहे ना...
तरी मनपाने या उरलेल्या रस्त्याचे पण भाग्य उजळवण्याचा प्रयत्न करावा...
सागर खोत
कुपवाड.