#पुरस्कार_नव्हे_जबाबदारी
#स्वराज्यरक्षक_छावाभूषण_पुरस्कार
सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी केलेल्या कामासाठी जेव्हा कौतुक होते तेव्हा मनापासून भारी वाटते. असंच कौतुक जेव्हा छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने समितीच्या वतीने करण्यात येते तेव्हा भारी नव्ह लईच भारी वाटतेय. असंच काही स्टेशन रोड छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने महाराजांच्या जयंती निमित्ताने मला स्वराज्यरक्षक छावा भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले तेव्हा झालं.
धाकल्या धन्यांच्या उत्सव सोहळ्यात माझ्या आजवरच्या सामाजिक क्षेत्रातील सेवेसाठी पुरस्कार नव्हे तर एक पुरस्काररुपी जबाबदारी समितीने हाती सोपवली.ती निश्चितच मी मनापासून पार पाडेल कायम तो प्रयत्न करेल. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्सव समिती सांगली व पदाधिकारी मा.सुधीरभाऊ चव्हाण सरकार, संस्थापक अध्यक्ष मा.नितीनभाऊ शिंदे,निमंत्रक मारुती ताटे,अजय नरळे,अमित धुमाळ मनोज पाटील, संदीप मंडले आणि सर्व समिती सदस्यांचे मनपूर्वक आभार....
मा नगसेवक,
अभिजित भोसले.
सा मि कु मनपा