Saturday 7 June 2025 10:19:18 PM

भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 27/05/2025 2:31 PM


भगूरला २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 

भगूर वार्ताहर:- क्रांतिकारकांचे मेरुमनी भगूर पुत्र क्रांतीसुर्य बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांची २८ मे रोजी जयंती असून त्यांच्या जयंतीनिमित्त भगूर शहरात विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी पोलीस अधिकारी रमेश पवार यांनी पत्रकाद्वारे दिली. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात आपल्या संसाराची समिधा अर्पण करून भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या भगूरपुत्र क्रांतीसुर्य तात्याराव सावरकर यांची जयंती सोहळा भगूर येथे सावरकरांच्या पवित्र भूमीत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवार दि.२८ मे रोजी दिवसभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी सकाळी ८.०० वाजता गायकवाड गल्ली येथून ज्येष्ठ कवी रवींद्र मालुंजकर यांच्या नियोजनाखाली व समीती अध्यक्ष दिपक बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली वीर सावरकर यांच्या ग्रंथ दिंडीचे आयोजन,नासिक येथील बाळासाहेब देशपांडे यांच्या सुप्रसिद्ध गुलालवाडी ढोलपथकाचे आयोजन,हभप नारायणराव आडके व सहकारी यांच्या माध्यमातून श्री गजानन महाराज भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन,महाराष्ट्र केसरी पैलवान प्रवीण पाळदे यांचे मर्दानी खेळ व मल्लखांब शिष्यवृंद या खेळाचे आयोजन तर इगतपुरी येथील आदिवासी मैदानी खेळाचे आयोजन आदींसह दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी जेष्ठ कवी, प्रकाशक,लेखक यांची संवाद्य मिरवणूक पालखीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुस्तके यांची शोभायात्रा होणार आहे  सदर सकाळच्या या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम,अभिनेते शरद पोंक्षे,ठाण्याचे आमदार संजय केळकर,नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक दत्ताजी कराळे,विश्व हिंदू परिषदेचे एकनाथराव शेटे,शिवसेना उपनेते विजय करंजकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यासह विविध क्षेत्रातील मान्यवर  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.भगूर पंचक्रोशीतील नागरिकांनी व सावरकर प्रेमींनी सदरचा कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर समितीचे सर्वश्री रमेश पवार,प्रताप पवार,राजेंद्र कापसे,शामराव शिंदे,शेखर बागडे,अनिल पवार,दिपक बलकवडे,प्रशांत कापसे,उत्तम शिंदे,उत्तमराव जाधव,हेमंत हेंबाडे,राधाकृष्ण गामणे,तानाजी करंजकर,ज्ञानेश्वर गणोरे, मुकुंद देशमुख,अमोल वालझाडे,निलेश हेंबाडे,गजानन कातकाडे,राजन गायकवाड,केशव कासार,वसंत पाटील, राजेंद्र बागडे,अविनाश कातकाडे,मंगेश बागडे,शैलेश उदावंत,निलेश ठाकूर,शाम भागवत,रवी येरम,मृत्युंजय कापसे,राजाभाऊ सोनवणे,सुनील थोरात, रवी महाले,काकासाहेब देशमुख,तानाजी भोर,विक्रम सोनवणे,प्रसाद आडके,प्रताप गायकवाड,विशाल बलकवडे,दिपक देशमुख,प्रमोद जाधव,किशोर गायकवाड, संभाजी देशमुख,मंगेश करंजकर,सुमित चव्हाण,पंकज शेलार,सुभाष जाधव,राजेंद्र जाधव,उत्तम आहेर,चंद्रकांत कातकाडे, अमर शिरसाठ,अशोक मोजाड,चेतन बागडे,कैलास भोर,शिवाजी घुगे,रवींद्र देशमुख,सुनील कासार,सचिन हेंबाडे, तुकाराम जगताप आदींसह स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या