Friday 4 July 2025 10:05:02 AM

* ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भव्य एक लाख झाडांची वृक्षारोपणाचा संकल्प : तानाजी भोर,

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 03/06/2025 2:20 PM

* ५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भव्य एक लाख झाडांची वृक्षारोपणाचा संकल्प : तानाजी भोर,


देवळाली कॅम्प ( प्रतिनिधी ):-  भारतीय जनता पार्टी पर्यावरण विकास आघाडीच्या वतीने "करून वृक्षांची वृध्दी, जपू पर्यावरणाची समृद्धी !! ५ जून रोजी .जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यात एक लाख भव्य वृक्षारोपण व वृक्ष लागवडीचा संकल्प सोहळा केला असून नाशिक जिल्ह्यातील दक्षिण विभागातील भाजपाचे १८ मंडल आहे.१८ मंडल अध्यक्षांशी तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी एक लाख झाडे वृक्षरोपण करण्याचा संकल्प केला आहे त्यापैकी देवळाली -भगूर मंडल पासून ह्या वृक्षारोपण लागवडीची सुरुवात होणार आहे. मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाले म्हणून पहिल्या टप्प्यात भाजपाचे नाशिक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजक पर्यावरण विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी भोर देवळाली- भगूर मंडलामध्ये देवळाली कॅम्प येथील श्री. गजानन महाराज मंदिर विजयनगर या ठिकाणी गुरुवार दिनांक ५ जून २०२५ रोजी.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सकाळी १० ते १२ दरम्यान प्रथम  ११००० हजार झाडांचे वृक्षारोपण लागवडीचे संकल्प देवळाली कॅम्प,भगूर परिसरात विविध मान्यवरांच्या व भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे नाशिक जिल्हा सरचिटणीस शरद कासार व संयोजक पर्यावरण विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष तानाजी भोर यांचे कार्यालय विजयनगर येथील श्री.साई समर्थ याठिकाणी दिली. याबैठक प्रसंगी देवळाली- भगूर मंडल अध्यक्ष प्रसाद आडके, तालुका उपाध्यक्ष हिरामण आडके, ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर कापसे,प्रताप गायकवाड, दिनेश गोविल, प्रकाश कर्डिले, संदीप शेटे, निलेश हासे, मयूर शेटे, प्रशांत वराडे, दिलीप मोरे आधी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या