सर्व सामान्य माणसाला खरे काय ते कळू दे हीच प्रार्थना : सतिश साखळकर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 08/06/2025 7:46 PM

आम्हाला कोणत्या राजकीय पक्षाची बाजू घ्यायची नाही 
प्रारूप मतदार यादी आणि अंतिम मतदार यादी याचा अभ्यास सध्याचे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते करतात का ..?
मतदान केंद्रावरील पोलिंग बूथ वर सध्या कार्यकर्ते असतात का भागातील पगारी नोकर..?

मतदान केंद्रात मतदान संपल्यावर 16 नंबरचा फॉर्म भरून पोलिंग बूथ वरील कार्यकर्ता आणतो का..?

प्रत्यके मतदार संघात प्रत्येक बुथवरील आकडेवारी 16 नंबर फॉर्म प्रमाणे जुळते का मतमोजणी च्या वेळी पहिली जाते का..?

त्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीचे ट्रेनिंग दिले जाते का..?

असे बरेचसे प्रश्न आहेत मग याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही कोण तर म्हणेल आमचा पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख सगळ आहे मग लोकसभेला काय झालं..?

तर दुसरा राजकीय पक्ष म्हणेल आमच्या कार्यकर्त्यांनी विजय खेचून आणला लोकसभेला..? विधानसभेच्या निवडणुकीत ते कार्यकर्ते कुठे होते कोठे कमी पडले..?

या सगळ्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाला आहे त्यामुळे काही न बोललेले बरे..
राहुल जी गांधी बेंबीच्या देटापासून सदर विषय मांडत आहेत मात्र त्यांच्याच पक्षाचे विधानसभेचे इच्छुक उमेदवार हे नेमके काय करत आहेत काही ठराविक अपवाद सोडले तर..
काही उमेदवारांनी रि कॉटिंगसाठी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे पैसे भरले होते त्याचे काय झाले...?
निवडणूक आयोगाने मतमोजणी परत का केली नाही...?
का ज्या पराभूत उमेदवारांनी पैसे भरले होते त्यांनी पैसे परत घेतले आहेत...? त्याचे कारण काय असावे का ते सत्ताधारी पक्षाला मॅनेज झाले असावेत
असे बरेचसे प्रश्न निर्माण होतात 
असो एकदा काहीतरी सोक्षमोक्ष लावाच सर्वसामान्य माणसाला एकदा खरे काहीतरी कळून दे हीच प्रार्थना....

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा 
Election Commission of India

Share

Other News

ताज्या बातम्या