आंधळी येथील चोरी प्रकरणी दहिवडी पोलिसांकडून चोरट्यास अटक

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 17/06/2025 11:15 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

आंधळी ता. माण येथील 
शेंडे मळा येथे झालेल्या घरफोडीत कमल तानाजी शेंडे यांच्या घरातील पत्र्याच्या कणगीत ठेवलेल्या डब्यातील पावणेदोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविणाऱ्या 
रामचंद्र भुजाब शेंडे (रा. आंधळी) या चोरट्यास दहिवडी पोलिसांनी जेरबंद केले, तसेच त्याच्याकडून चोरलेली रक्कम हस्तगत करण्यात आली.
          याबाबत सविस्तर माहिती अशी की कमल शेंडे यांच्या घरातील पत्र्याच्या कणगीत ठेवलेल्या डब्यात ३७ ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, दोन ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले, लाल खडा व मोती असलेल्या तीन ग्रॅम वजनाच्या दोन सोन्यांच्या नथी, तसेच सहा हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल ठेवला होता. अज्ञात चोरट्याने श्रीमती शेंडे यांच्या घराचे कुलूप कशाने तरी उचकटून आत प्रवेश करून पत्र्याच्या कणगीत ठेवलेल्या डब्यातील दागिने व रोख रक्कम असा पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेची नोंद दहिवडी पोलिसांत झाली होती. 
         ज्ञज्ञसदर गुन्ह्यातील फिर्यादी तानाजी शेडे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रारी वरुन दहिवडी पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे, स्वाती धोंगडे, पोलीस उप निरीक्षक गुलाब दोलताडे, नितीन धुमाळ, पोलीस कॉस्टेबल अजिनाथ नरबट,, निलेश कुदळे, मंहेंद्र खाडे, लक्ष्मण कुचेकर यांनी गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवुन गोपणीय बातमीदारा मार्फत माहितीकाढुन रामचंद्र भुजाब शेंडे वय ५४ वर्षे रा. शेंडेमळा आंधळी ता. माण जि. सातारा यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हयाचे कबुली दिल्याने त्याचेकडून ३७ ग्रॅम वजनाची १,४८,००० रुपये किंमतीची सोन्याची मोहनमाळ हस्तगत करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे या करीत आहे


Share

Other News

ताज्या बातम्या