नांदेड :- दिनांक 9 ते 14 डिसेंबर 2025 यादरम्यान शेगाव जिल्हा बुलढाणा येथे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरुष गट 92 वी.तर युथ महिला 20 वी जिजाऊ कप बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन व बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित होत आहे. या महाराष्ट्र बॉक्सिंग स्पर्धेमध्ये नांदेड जिल्ह्याचा संघ निवड चाचणी नुकतीच विक्रांत खेडकर बॉक्सिंग अकॅडमी उर्वशी घाट वजीराबाद नांदेड येथे संपन्न झाली.या निवड चाचणीमध्ये 92 व्या वरिष्ठ गट पुरुष स्पर्धकांमध्ये. १ अरवीद सावंत वजन 49 की ..
२ रोहित धुळे 53कीलो. 3. अभिजीत सावंत 56की ४. रोहित निवडंगे वजन 63की. ५ अनिकेत निवडुंगे 66. की...६.. नितीन कांबळे 105 कीलो तर महिला युथ गटामध्ये. १. धनश्री वाघमारे 55की. २ इंदिरा बोडखे 74 की. यांची निवड निश्चित झाली आहे ही निवड चाचणी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष व नांदेड जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव विक्रांत खेडकर सर यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली या निवड चाचणी मधून निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे नागार्जुना पब्लिक स्कूलचे संचालक बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष श्री केशव गड्डम सर इंजिनिअर कार्याध्यक्ष श्री अनिरुद्ध जी शिरसाठ व्यवस्थापक व मार्गदर्शक स्वामी माधवदासजी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले. निवड चाचणी पंच म्हणून सत्यपाल हनवते. लक्ष्मीकांत हटकर. शाहीद पटेल. रोहीत नांदेडकर. प्रदीप वाघमारे, अजय जाधव रूपेश भवरे निलेश काळे यांनी काम पाहीले या सर्व निवड झालेल्या खेळाडूंची अजय राहटे. सिद्धू भाऊ स्वामी भरत यादव, संतोष भाऊ नरवडे. कल्पना मॅडम गंगाधर वाघमारे. तारखेस गोडबोले. रवी घोरबांड. यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यकर्ता शुभेच्छा दिल्या.