श्री. एकनाथराव शेटे महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र आदरांजली
शिक्षण मंडळ भगूर संचालित श्री. एकनाथराव शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, दे. कॅम्प येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मान. श्री. जितेंद्र भावसार सर (सहकार्यावर शिक्षण मंडळ, भगूर) उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून जी.एम.डी. महाविद्यालय, सिन्नर येथील डॉ. मनोज गवारे सर यांनी बाबासाहेबांच्या विचारधारा, संविधाननिर्मितीतले योगदान आणि सामाजिक परिवर्तनातील त्यांची भूमिका यावर प्रकाश टाकला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे सर यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कार्यक्रम अधिकारी प्रा. तुषार तेलोरे यांनी केले. प्रारंभीचे प्रास्ताविक प्रा.अमृत गवळी सर यांनी सादर केले. पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्रा. प्रेरणा कुलकर्णी यांनी केले, तर कार्यक्रमाचा समारोप प्रा. अश्विनी पगारे यांच्या मनोगत आभारप्रदर्शनाने झाला.
कार्यक्रमास कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी , प्राध्यापक व प्राध्यापक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन अर्पण केले.