नांदेड :- नांदेड शहरात दर वर्षी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या थाटात काढली जाते.त्या अनुषंगाने याही वर्षी एक फेब्रूवारी 2026 रोजी संत रविदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.त्या संदर्भात दिनांक सात डिसेंबर रोजी नांदेड शहरातील तरोडा नाका भागात राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्ही.व्ही कांबळे यांची उपस्थिती होती.या बैठकीत जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी संजय सोनटक्के तर कार्याध्यक्षपदी संदीप गोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या वर्षी विविध देखाव्यासह संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
या बैठकीसाठी के.के.गंगासागरे,गजानन जोगदंड,बालाजी गंगासागरे,रवी गंगासागरे,तानाजी सोनटक्के,विशाल बनसोडे यांच्या सह राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व समाजबांधव यांची उपस्थिती होती.