आज कुपवाड शहरातील प्रमुख रस्त्यापैकी एक असणारा भारत सूतगिरणीचे लक्षण मंदिर रस्त्याचे काम बऱ्याच दिवसापासून सुरू आहे. या रस्त्यावरून प्रचंड वाहतूक असून यावरती संथ गतीने काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहनधारकांना धुळीचे प्रमाण वाढलेले असून या ठिकाणी सदर रस्त्याचे काम जलद गतीने करण्यासाठी मागणी केली होती या अनुषंगाने आज उपमहापौर गजानन मगदूम यांनी या रस्त्याची पाहणी केली. तसेच कामामध्ये दर्जा राखण्याचे सूचना प्रशासन व कंत्राटदारांना दिली लवकरच या रस्त्याचे पूर्णत्वास आल्यानंतर ना कुपवाड शहरातील मुख्य रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे यावेळी शाखा अभियंता ऋतुराज यादव,सामाजिक कार्यकर्ते मुदसर मुजावर उपस्थित होते.