५ टक्केपेक्षा कमी बुकिंग असणाऱ्या स्थानकांचे थांबे होणार रद्द तर आवश्यक असणाऱ्यां स्थानकांना मिळणार थांबे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/03/2026 3:57 PM

    भारतीय रेल्वे मेल, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांच्या थांब्यांमध्ये एक मोठा बदल लागू करत आहे. नवीन धोरणांतर्गत, ज्या स्थानकांवर गेल्या सहा महिन्यांत ५% पेक्षा कमी बुकिंग होते, त्या स्थानकांवरील गाड्या रद्द केल्या जातील.

रेल्वे बोर्डाच्या म्हणण्यानुसार, थांबे आता पूर्णपणे व्यावसायिक आणि डेटा-आधारित असतील. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित अल्गोरिदमचा वापर केला जाईल. २५% पेक्षा जास्त मागणी असलेल्या स्थानकांवर नवीन थांबे आपोआप जोडले जातील.

असे वृत्त आहे की, मध्यरात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत जिथे बोर्डिंग शून्य असेल, तेथील थांबे सर्वप्रथम रद्द केले जातील. हे धोरण उत्तर रेल्वे आणि उत्तर मध्य रेल्वेच्या व्यस्त मार्गांवर लागू केले जाऊ शकते.

रेल्वेचा दावा आहे की, या डायनॅमिक हॉल्ट धोरणामुळे ट्रेन प्रवासाचा वेळ ३० मिनिटांपासून ते २ तासांपर्यंत कमी होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक थांब्यामागे सरासरी ८-१० मिनिटांची बचत होते, तर प्रत्येक थांब्यासाठी रेल्वेला अतिरिक्त इंधन आणि वेळेचे नुकसान सोसावे लागते.

मात्र, लहान स्थानकांवरील थांबे रद्द केल्यामुळे आंदोलने होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे अशा स्थानकांवर मेमू आणि प्रवासी गाड्यांची वारंवारता वाढवण्याचा विचार करत आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या