शिक्षक परिषदेच्या वतीने व्यंकटराव कल्याणपाड यांच्या सेवापूर्ती निमित्त सपत्नीक सत्कार;संजय देशटवाड यांच्या कडून ग्रंथ भेट

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 22/03/2026 5:17 PM

नांदेड :- शिक्षक नेते श्री व्यंकटराव कल्याणपाड यांच्या सेवापूर्ती निमित्त शिक्षक परिषदेच्या वतीने सपत्नीक त्यांचा सत्कार करण्यात आला.आदर्श पालक तथा शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रात अखंड कार्यरत जीवनभर शिक्षक हित व विद्यार्थी हितासाठी कार्यतत्पर व्यक्तिमत्व
मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा नगरीचे भूमिपुत्र शिक्षण क्षेत्रात तब्बल 34 वर्षे निष्ठा प्रामाणिकपणा आणि कार्य तत्परतेने सेवा बजावणारे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नुतन भोकर येथून सेवानिवृत्त झालेले शिक्षक नेते आदरणीय श्री व्यंकट कल्याणपाड यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद परिवाराच्या वतीने सेवापुर्ती निमित्त त्यांचा भव्य सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी शिक्षक परिषदेचे प्रांत अध्यक्ष मधुकर उन्हाळे, विभागीय कार्याध्यक्ष बालाजी पाटील बामणे,युवा नेते बाळु पाटील सावंत,जिल्हा अध्यक्ष व्यंकट गंदपवाड, जिल्हा कार्यवाह प्रल्हाद राठोड,जिल्हा कोषाध्यक्ष धोंडिबा पांडागळे, जिल्हा कार्यालयीन सचिव बळवंत मंगनाळे, जिल्हा वरिष्ठ कार्याध्यक्ष बालाजी पांपटवार,जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष मिथुन मंडलेवार, जिल्हा संघटक संजीव मानकरी, पदाधिकारी रत्नाकर केंद्रे, संग्राम कांगणे, गंगाधर गिरोड,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल मुखेडकर यांच्या सह आदींची उपस्थिती होती.
तसेच जिल्हा परिषद कन्या शाळा,कसबे तडवळे जि.धाराशिव शाळेतील अभ्यासू,आदर्श शिक्षक संजय देशटवाड यांनी व्यंकटराव कल्याणपाड याना सेवापूर्ती निमित्त ग्रंथ भेट देत शुभेच्छा दिल्या.

Share

Other News

ताज्या बातम्या