गुरुवार दि.२३/०४/२०२५ रोजी देशभक्त आर.पी.पाटील विद्यालय,कुपवाडमध्ये खेळ प्रशिक्षण शिबीराची सुरवात झाली.
शिबीराचे उद्घाटन यशवंत शिक्षण संस्थेचे नुतन चेअरमन सौ.सरोज रायनाडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.एस.पी.चव्हाण यांनी केले.
या शिबीरामध्ये खो-खो,क्रिकेट,बेस बॉल,सॉफ्टबॉल या सांघिक खेळाबरोबरच रायफल शुटींग,लाठीकाठी,हॉर्सरायडिंग,कराटे,किकबॉक्सिंग,तायक्वांदो,योगासन,दोरखंड,छोटे खेळ,आर्चरी या खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आजच्या सत्रामध्ये खो-खोचे प्रशिक्षण प्रा. योगेश तोडकर तर क्रिकेटचे प्रशिक्षण क्रिकेटचे प्रशिक्षक श्री.दिपक माळी सर यांनी दिले.
चेअरमन सौ.रायनाडे मॅडम, संचालक श्री.राजगोंडा पाटील तात्या व श्री.एन.पी.पाटील यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी देशभक्त आर.पी. पाटील विद्यालयाचे शाला समिती अध्यक्ष श्री.ए.ए. पाटील.नवजीवन प्राथमिक शाळेचे शाला समिती अध्यक्ष श्री.एन.पी.पाटील,श्री.
वंजाळे सर,यशवंत शिक्षण संस्थेचे संचालक श्री.राजगोंडा पाटील,सौ.वैशाली देवर्षी,माजी उपमहापौर श्री.मोहन जाधव,शाला समिती सदस्या सौ मुजावर मॅडम उपस्थित होते.
सुत्रसंचलन सांस्कृतीक विभाग प्रमुख श्री.एस.बी.बाबर यांनी केले तर आभार सौ.आर.एस.कलमडे यांनी मानले.