NCERT कडून इयत्ता ८ वीच्या “Exploring Society: India and Beyond” या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून इ.स. १७५९ सालचा मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्याचा निर्णय ठरविण्यात आला आहे.
दिनांक १ मे रोजी NCERT च्या मनमानी निर्णयाचा निषेध व हिंदवी स्वराज्य म्हणजेच मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चाचे सांगली येथे आयोजन करण्यात येणार आहे.
याचे नियोजन करण्यासाठी सर्वपक्षीय व सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन आज दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सर्किट हाऊस माधव नगर येथे करण्यात आले होते.
यावेळी सर्वपक्षीय व सर्व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सतिशराव साखळकर यानी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
सांगली मध्ये वेगवेगळ्या विचारांच्या सर्व संघटना व सर्वपक्ष एकत्र आल्याबद्दल श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या नितीन दादा चौगुले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार पुढे अटक ते कटक व पेशावर ते तंजावर पर्यंत झाला. राजस्थान मधील काही घटकांनी NCERT कडे तक्रार केल्यामुळे इ.8 वी च्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकण्यात आला .
या संदर्भात NCERT ने महाराष्ट्र सरकार तसेच इतिहास अभ्यासक यांच्याकडे कोणताही अभिप्राय न मागता एकतर्फी मनमानी निर्णय घेतला.
या निर्णयाचा निषेध व हिंदवी स्वराज्य म्हणजेच मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चाचे सांगली येथे 1 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता आयोजन करण्यात आले आहे.हा सर्व नकाशा पूर्ववत पाठ्यपुस्तकांमध्ये घ्यावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ते इ.स.1757 साली ब्रिटिशांची सत्ता येईपर्यंत च्या कालावधीतील मराठ्यांचा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करून घ्यावा अशी केंद्रसरकार कडे मागणी करणार आहे अशी पार्श्वभूमी सर्व उपस्थितांना नितीनदादा चौगुले यांनी सांगितली.
यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनी हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आपापल्या सूचना मांडल्या व या मोर्चा साठी पाठींबा दिला.
हा मोर्चा माता भगिनींसह
हजारोंच्या संख्येत पार पाडण्याचा सर्वांनी निर्धार केला.
यावेळी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे सर, नगरसेवक अभिजीत भोसले, कॉंग्रेसचे सा.मि.कु.चे विरोधी पक्षनेते मंगेशराव चव्हाण ,
नगरसेवक मयूरशेठ पाटील,राष्ट्रवादी शरद पवार गटचे मा.नगरसेवक सागरभाऊ घोडके, मिरज शहर प्रमुख अभिजीत दादा हारगे, ए.शिं.गटचे संघटक महेंद्रभाऊ चंडाळे,ए.शिं.गटचे मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी,उ.भा.ठा. गट शिवसेनाचे जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, शहरप्रमुख मयूर घोडके,
भाजपाचे नगरसेवक लक्ष्मणराव नवलाई, वारकरी परिषदेचे विजयबापू म्हैसकर,जनसुराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत काळे,मनसेचे कुमार सावंत,
RSS चे किरणदादा गोसावी,अभिमन्यू नाना भोसले, सिनेट सदस्य विशाल गायकवाड,
मराठा सेवा संघाचे डॉ. संजय पाटील, नितीनराव चव्हाण, R.S. पवार साहेब,मराठा क्रांती मोर्चाचे विजयराव पाटील, राहूल पाटील, प्रशांत भोसले, राजेश जगदाळे, विलासराव देसाई, संभाजी ब्रिगेडचे
प्रमोद सूर्यवंशी, राजेंद्र पाटील,अ.भा.मराठा संघाचे दादासो पाटील, तानाजीराव भोसले,
सुरेशराव दुधगावकर,स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे प्रशांत सदामते,मातंग समाजाचे प्रतिनिधी जितेंद्र हेगडे, डॉ बाबासाहेब जयंती मंडळ महोत्सव उपाध्यक्षप्रफुल्ल जगन्नाथ ठोकळे,जिल्हा संघर्ष समितीचे तानाजी भाऊ रुईकर व रविन्द्र चव्हाण, मुस्लिम समाज समिती सदस्य जब्बारभाई बारस्कर,लालूभाई मेस्त्री, श्रीराम प्रतिष्ठानचे पृथ्वीराज पाटील यांच्यासह सर्व शिवभक्त व युवा सहकारी उपस्थित होते.