*श्री शेटे महाविद्यालयात महाराष्ट्र दिन संपन्न* शिक्षण मंडळ, भगूर संचलित श्री एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, देवळाली कॅम्प येथे दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ, भगूर संस्थेचे कार्यवाह मा. श्री. सचिन पाटील सर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. श्री. सचिन पाटील सर यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी दिलेले बलिदान व त्याग यांचा उल्लेख केला. तसेच कामगार दिनाचे महत्त्व अधोरेखित करत कामगारांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन केले. याच दिवशी बुद्ध पौर्णिमा असल्याने या तिन्ही महत्त्वपूर्ण घटनांचा सुंदर संगम त्यांनी आपल्या भाषणातून मांडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुषार तेलोरे यांनी प्रभावीपणे केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.