नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आज दि.२६ जुन २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता *थोर समाज सुधारक “राजर्षि शाहु महाराज”* यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पावडेवाडी नाका येथील पूर्णाकृती पुतळ्यास *महापौर सौ. कविता संतोष मुळे* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
महान समाजसुधारक आणि कोल्हापूर संस्थानाचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दरवर्षी २६ जून रोजी साजरी केली जाते. शोषित, वंचित आणि मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या या महान कार्याचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून त्यांचा जन्मदिवस "सामाजिक न्याय दिन" म्हणून साजरा केला जातो.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, उपायुक्त नितीन गाढवे, उपआयुक्त स.अजितपालसिंग संधु, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत रिट्ठे, नगरसेवक प्रतिनिधी कुलदीप राक्षसमारे, उद्यान अधिक्षक डॉ.फरहतुल्ला बेग,क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे, निलावती डावरे, वरिष्ठ लिपिक शुभांगी चौधरी यांच्यासह मनपाचे कर्मचारी व शहरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.