नांदेड :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात ओम गार्डन, कौठा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
विविध शासकीय विभागांनी एकाच ठिकाणी नागरिकांना शासकीय योजनांची माहिती, अर्ज स्वीकृती, मार्गदर्शन व विविध सेवांचा लाभ उपलब्ध करून दिला. या शिबिरामध्ये संजय गांधी निराधार योजना विभाग, पुरवठा विभाग (तहसील कार्यालय नांदेड), तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), पंचायत समिती ग्रामविकास विभाग, सायबर सेल व भरोसा सेल (जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड), जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालय, अनुलोम संस्था, अमृत विभाग, महावितरण विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग तसेच पीएम स्वनिधी योजना आदी विभागांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
एकूण ३ हजार ४२९ नागरिकांनी विविध विभागांच्या स्टॉलना भेट देऊन शासकीय योजनांची माहिती व सेवा घेतल्या. त्यात जिवंत सातबारा वाटप, महिला शेतकरी प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू दाखले, रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कर्जवाटप, महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत बचत गटांना कर्जवाटप, लेक लाडकी योजना, लखपती दीदी योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्राधान्य गट लाभार्थींना शिधापत्रिका वाटप, बेबी किट वाटप, अमृत प्रशिक्षण योजना, भूमी अभिलेख विभागाची स्वामित्व योजना, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना, राष्ट्रीय खाद्यतेल अभियान, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजना अशा शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना व सेवांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला.
यावेळी पात्र ८६० लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. यामध्ये उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान-५०, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)-६०, प्रमाणपत्र/आधार सेवा-१००, रेशन कार्ड-१००, पीएम स्वनिधी-२०, पंचायत समिती-१००, तालुका आरोग्य अधिकारी-३०, रमाई आवास-५०, अमृत विभाग-३०, सीडीपीओ (ग्रामीण)-२०, सीडीपीओ (शहर)-५०, तालुका कृषी अधिकारी-५०, महावितरण विभाग-५०, सहकार विभाग-५० तसेच परिवहन विभागामार्फत १०० लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.
शिबिरादरम्यान डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिराचा ३ हजार ४१६ नागरिकांनी लाभ घेतला. हा उपक्रम डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.
याचबरोबर शिबिरामध्ये रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, त्यांच्या समस्या तत्काळ सोडविणे आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता. या यशस्वी आयोजनासाठी सर्व शासकीय विभाग, अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमास बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आ. हेमंत पाटील, महापौर कविता मुळे, आमदार आनंदराव बोंढारकर, उपमहापौर दीपकसिंग रावत, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, नगरसेवक काकडे, शीतल खंडेल, जिल्हा अधीक्षक (भूमी अभिलेख) सीमा देशमुख, मुद्रांक विभागाचे जिल्हाधिकारी महेश वडदकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका कृषी अधिकारी संजय चातरमल, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बळवंत मस्के, धम्मदीप ढवळे, माविमचे राहुल शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण मुंडे, सीडीपीओ शिवगंगा पवार, कैलास तिडके, पीएम स्वनिधी योजनेचे किशन कदम, महावितरणचे सुशीलकुमार वाघमारे, आवास योजनेचे प्रकाश कांबळे, सामाजिक वनीकरण विभागाचे लाखेकर, गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे, सायबर पोलीस सेलचे पोलीस निरीक्षक विलास सप्रे, नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, भरोसा सेलच्या रूपाली कानगुले, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कंकावार, अनुलोम सामाजिक संस्थेच्या पूजा गोडघासे, आपले सरकार सेवा केंद्राचे विजय जोंधळे तसेच नांदेड मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार प्रमुख दिग्विजय नरंगले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यासह नांदेड दक्षिण मतदार संघातील हजारो नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट व प्रभावी निवेदन मुरलीधर हंबर्डे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार, नायब तहसीलदार संजय नागमवाड, नायब तहसीलदार सुनील माचेवाड, पुरवठा अधिकारी रवींद्र राठोड, मंडळ अधिकारी सोपान गुंडाळे, मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, मंडळ अधिकारी रूपाली वाठोरे, मंडळ अधिकारी श्रीकृष्ण येलमटे, मंडळ अधिकारी संतोष आस्कुलकर, मंडळ अधिकारी सय्यद मोहसिन, मंडळ अधिकारी मधुकर फुलवळे, पुरवठा निरीक्षक रवींद्र राठोड, तसेच देविदास जाधव, शिवानंद स्वामी, सर्व ग्राम महसूल अधिकारी, सर्व ग्रामसेवक व सर्व कृषी सहाय्यक, सर्व ग्राम महसूल सेवक यांच्यासह नांदेड तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.