सांगली स्टेशन चौकात दि. २४ जुलैपासून " सांगली जंतर मंतर आंदोलन "

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/07/2026 9:35 PM

सोनम वांगचुक व विद्यार्थी कार्यकर्ते  नेहा बोरा, आयीशी घोष, अदर्श साजी आणि त्यांचे साथीदार , असंख्य युवकांसह दिल्ली स्थित जंतर मंतर येथे दि. २८ जून २०२६ पासून गेले २० दिवसापासून तर काहीजण १६ जुलैपासून उपोषण आंदोलन करत  होते. २१ जुलै रोजी मोठ्या प्रमाणात लाठीहल्ला केला. कोवळ्या पोरांना क्रुरपणे मारल गेल. मुलींना सुद्धा सोडल नाही.  नीट परीक्षेतील पेपर फुटी मुळे आणि पुन्हा परीक्षा द्यावी लागली असल्याने त्यातून आलेल्या नैराश्यातून २० विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. या आत्महत्यांना सर्वस्वी व्यवस्था जबाबदार आहे आणि ही व्यवस्था सांभाळण्याचे काम राजकीय नेतृत्व करत असते .त्यामुळे अशा गंभीर घटनेची दखल घेऊन आणि राजकीय जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांनी मनुष्यबळ विकास मंत्री म्हणून असलेल्या पदाचा राजीनामा द्यावा ही रास्त मागणी आंदोलनकर्त्यांची आहे .तथापि दिनांक १८ जुलै  २०२६ रोजी दिल्ली पोलिसांनी पोलिसी बळाचा वापर करत सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून उचलून नेले आणि काही तासातच जंतर-मंतर वरील आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. संविधानाने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची मुभा दिलेली असून तो नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे, या अधिकारांची गळचेपी  केंद्र सरकारने केलेली आहे, या गळचेपीच्या विरुद्ध आपण संविधानाचे रक्षक म्हणून सोनम वांगचुक आणि विद्यार्थी कार्यकर्ते नेहा, आयशी, आदर्श व त्यांचे साथीदार यांच्या रास्त मागणीला आणि आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. 
२४ जुलै पासुन आम्ही *जंतर* *मंतर सांगली* या बॅनर खाली बेमुदत धरणे आंदोलन सुरू करत आहोत. हे आंदोलन दररोज ५ ते ७ या वेळेत चालेल.
 प्रस्तुत मागणी ही मान्य करून माननीय नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ पदावरून हटवावे किंवा त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी  आपण करत  आहोत.
हा आपल्या देशातील युवकांच्या भवितव्याचा प्रश्न असून कायद्याचे रक्षक म्हणून आपल्यावर या संघर्षात उभे राहण्याची ऐतिहासिक जबाबदारी आहे. केंद्र सरकारने या आंदोलकांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन उभा करण्याचा ईशारा आम्ही देत आहोत.  आजच्या या आंदोलनात उमेश देशमुख,  विकास मगदुम, सतिश साखळकर,  अजित सुर्यवंशी, डाॅ. नंदा पाटील, किशोर केदारी , प्रा. वंदना साबळे, डाॅ. किसनराव साबळे, तुळशीराम गळवे इ. सह सर्व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्त मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.

Share

Other News

ताज्या बातम्या