कुपवाड संघर्ष समितिच्या बेमुदत आंदोलनास आजपासून सुरव सुरुवात

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/07/2026 9:37 PM

सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेने नागरिकांवर लादलेल्या अन्यायी घरपट्टी वाढीच्या निषेधार्थ कुपवाड शहर संघर्ष समितीच्या वतीने कुपवाड येथे आजपासून आमरण उपोषण आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे.

या आंदोलनामध्ये संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष श्री.आशुतोष धोतरे, सचिव श्री.दाऊद मुजावर, उपाध्यक्ष श्री.गोरख व्हनखंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस SP कुपवाड शहर अध्यक्ष श्री.तानाजी गडदे आम्ही चौघेजण नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आमरण उपोषणास आज पासून बसलो आहोत.

आज उपोषणस्थळी अनेक राजकीय नेते, आजी-माजी नगरसेवक,  सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी नेते, उद्योजक यांनी भेट देऊन या आंदोलनाला बळ व जाहीर पाठिंबा दिला आहे.

कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती कुपवाड

Share

Other News

ताज्या बातम्या