नांदेड दक्षिण मतदारसंघात २२ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/07/2026 8:27 PM

नांदेड : माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या जन्मदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ओम गार्डन, कोठा, नांदेड येथे नांदेड दक्षिण मतदारसंघासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटन नांदेड दक्षिणचे आमदार आनंद तिडके पाटील बोंढारकर यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरामध्ये महसूल, ग्रामविकास, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, सामाजिक न्याय, महावितरण, जलसंपदा, पशुसंवर्धन, सहकार, नोंदणी, भूमी अभिलेख, परिवहन तसेच इतर विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देणार असून पात्र लाभार्थ्यांना विविध सेवांचा व योजनांचा प्रत्यक्ष लाभ उपलब्ध करून देणार आहेत.

शासनाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविणे, विविध प्रमाणपत्रे, दाखले, योजनांचा लाभ, तक्रारींचे त्वरित निराकरण आणि नागरिकांना एकाच ठिकाणी विविध विभागांच्या सेवा उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

नांदेड दक्षिण मतदारसंघातील सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या