गोवंश तस्करीविरुद्ध मोठी कारवाई; 12 गोवंशीय जनावरे व महिंद्रा पिकअपसह ₹8.65 लाखांचा मुद्देमाल जप्त;अर्धापुर पोलीस स्टेशन ची कारवाई

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/08/2026 6:47 PM

नांदेड:- मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने नांदेड जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमे अंतर्गत अर्धापूर पोलिसांनी गोवंशाची अवैध वाहतूकीवर धाडसी व नियोजनबद्ध कारवाई करून अवैधरित्या वाहतूक करण्यात येणाऱ्या 12 गोवंशाची सुटका केली.

दिनांक 10/08/2026 रोजी महादेव मांजरमकर, प्रभारी अधिकारी, अर्धापुर यांना विश्वसनीय माहिती मिळाली की, अर्धापूर पोलीस ठाणे हद्दीतील करीम कॉलनी, अर्धापूर येथील कॅनॉलच्या पूर्वेकडील परिसरात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक होत आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून तपासणी केली असता 12 गोवंश जातीची जनावरे (बैल) त्यापैकी 03 जनावरे महिंद्रा पिकअपमध्ये भरून वाहतूक करण्याच्या तयारीत, तसेच 09 जनावरे टिनपत्राच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेली असल्याचे निदर्शनास आले. जनावरांना निर्दयीपणे वागणूक देऊन त्यांची अवैध वाहतूक केली जात असल्याचे दिसुन आले. प्राथमिक तपासात पोलिसांनी सर्व 12 गोवंशीय जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षित ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

सदर कारवाईत 12 गोवंशीय जनावरे (बैल) अंदाजे किंमत ₹4,65,000/- महिंद्रा कंपनीची पिकअप वाहन क्रमांक MH-32-Q-5138 अंदाजे किंमत ₹4,00,000/-, असा एकूण ₹8,65,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात 1) तुळशिदास दादाराव गावंडे, वय 31 वर्षे, रा. विठोली, ता. जि. यवतमाळ 2) शेख करीमुद्दीन शेख वहीमोद्दीन, वय 38 वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. बिलालनगर, अर्धापूर 3) नामदेव देवराव नरवाडे, वय 58 वर्षे, व्यवसाय व्यापार, रा. शेवाळा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली. 4) शिवाजी किशनराव मस्के, रा. शेणी, ता. अर्धापूर, जि. नांदेड (फरार) या आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून, सदर प्रकरणी पोलीस ठाणे अर्धापुर गु.र.नं. 439/2026 कलम 5(3)), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच कलम 11 (1)) (C), (E), (D), (G) प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 3(5) आणि बी.एन.एस. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि/सुरेश भोसले हे करीत आहेत.

ही कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या आदेशाने पोनि/ महादेव मांजरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि / भास्कर कांबळे, पोउपनि/सुरेश भोसले, भिमराव राठोड, घोरपडे, सुभाष मुंगल, सलीम शहा, ज्ञानेश्वर भिसे, हेमंत बिचकेवार, कृष्णा चुनोडे यांनी पार पाडली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या