श्री एकनाथराव सहादू शेटे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात *ग्रंथपाल दिन* उत्साहात साजरा झाला.... भारताचे ग्रंथालयशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंती निमित्त बुधवारी दिनांक 12 रोजी राष्ट्रीय ग्रंथपालदिन महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती च्या पूजनाने दीपप्रज्वलन व डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्यूंजय कापसे सर यांनी भुषविले.
याप्रसंगी डॉ. एस. आर रंगनाथन यांच्या जीवन कार्यावर व भारतीय ग्रंथालय क्षेत्रातील त्यांच्या योगदानावर ग्रंथपाल प्रा ममता शिराळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा रोहिणी जगताप यांनीआपल्या मनोगता मध्ये विद्यार्थी जीवनात ग्रंथालय वापराचे महत्त्व तसेच ग्रंथ वाचनातून आपण स्वतः ला अतिशय उत्तमरित्या समृद्ध करू शकतो असे प्रतिपादन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना प्रा. डॉ. मृत्यूंजय कापसे सर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड जोपासण्यची तसेच ग्रंथालयातील विविध संसाधनांचा वापर करून वाचन अधिक समृद्ध करण्या निदान दिवसातून 5पाने वाचन नक्की करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता जोशी यांनी केले या वेळी प्रा प्राजक्ता यांनी डॉ. आंबेडकरांच्या जीवनातील ग्रंथालयात घडलेला प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. प्रेरणा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, इतर कर्मचारीवर्ग आणि विद्यार्थांचे विशेष सहकार्य लाभले.