ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

दक्ष रहाल तरच मनस्ताप टळेल... बॅंक व्यवहारात.


  • श्री मल्हारी घाडगे (Navimumbai)
  • Upadted: 12/2/2020 3:28:05 PM

गेल्या आठवड्यापासून बॅंक मायग्रेशनचे काम चालू असल्याने आपल्या खात्यात पगार जमा झाला की नाही याची खात्री करा. आता केंद्र सरकारने मुख्य चार बॅंकांमध्ये अन्य सरकारी बॅंका मर्ज केल्या आहेत. त्यामुळे ईसीएस् मॅंडेट आयएफ्सी कोड बदली होणार आहे. संबंधित बॅंका आपले या पुर्वी दिलेले चेक्स फक्त दोन महिने आॅनर करणार आहेत. आपल्या कर्जाचे हप्ते देखील खात्यातून वजा होणार नाहीत. बऱ्याच कर्मचाऱ्यांचे पगार खात्यात जमा झाले नसल्याची शक्यता नाकारता येणार नाही. तेंव्हा वैयक्तिक पातळीवर आपला पगार आणि संबंधित खात्याचे ऑनलाईन व्यवहार सुरळीतपणे होत आहेत ना ? याची खात्री करा ज्यामुळे पुढे होणाऱ्या बॅंकेच्या व्यवहारामुळे आपल्याला मनस्ताप सहन करावा लागणार नाही.कृपया ही माहिती पुढे इतरांना कळवून सहकार्य करा.Share

Other News