मॉयल मध्ये वैद्यकिय दृष्टया असक्षम ठरलेल्याच्या वारसांना अनुकंपा तत्वावर समाविष्ट करा ठाकचंद मुंगूसमारे

  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 14/06/2021 6:30 AM


 

खा प्रफुल पटेल यांना निवेदन 

रोहित बोंबार्डे
तुमसर प्रतिनिधी :-- तालुक्यातील डोंगरी बूज व चिखला येथिल मॅगनिज और इंडिया लिमिटेड (MOIL) मध्ये काम करणारे  बरेच कामगार आणि कर्मचारी  हे वैद्यकिय दृष्टया असक्षम ( मेडिकल अनफिट) झाले असतांना अजून पर्यंत मॉयल  प्रशासनाने  त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नौकरी दिली नसल्याने खान कामगार व कर्मचाऱ्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली असुन त्यांच्या  वारसांना तात्काळ अनुकंपा तत्वावर समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी रायुका तालुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी खा प्रफुल पटेल यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे 

संपूर्ण आशिया खंडात प्रसिद्ध अशा  मॅग्नीज खाणी तुमसर तालुक्यातील डोंगरी बूज व चिखला येथे आहेत या खाणी ओपन कास्ट व अंडर ग्राउंड खाणी आहेत खाणीत काम करत असतांना कामगारांना आरोग्य वर विपरीत परिणाम होत असून सेवा संपण्या पूर्वी ते कामगार वैद्यकीय दृष्ट्या अक्षम होत असल्याने त्यांना घरी बसावे लागते त्यांच्या परिवारावर उपासमारी ओढवू नये म्हणून अशा वैद्यकीय अक्षम  कर्मचारी व कामगारांच्या वारसांनाना  मॉयल ( खाणीत) मध्ये अनुकंपा तत्वावर समाविष्ट केल्या जाते मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मॉयल प्रशासनाने अनुकंपा तत्वावर भरती केली नसल्याने हजाराच्या संख्येत वैद्यकीय अक्षम असलेल्या कर्मचारी तसेच कामगारांच्या कुटुंबियांवर तर उपासमारी ओढवली आहेच त्याच बरोबर शासनाकडून मॉयल शी करार ( ऍग्रिमेंट) सन 2017 मध्ये झाले मात्र अजून पर्यंत त्या करारा च्या लाभाची रक्कम मॉयल मध्ये कार्यरत मजुरांना व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कष्टाचा लाभ आतापर्यंत देण्यात न आल्याने मॉयल प्रशासन हे तेथील कामगारांना नाक दाबून बुक्क्यांचा मार देत आहे या समस्याचा तातडीने पाठपुरावा करावा अशी मागणी रायुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी निवेदनातुन केली  

Share

Other News

ताज्या बातम्या