ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*वेकोलीचे सर्व प्रश्न सोडवून 12 ऑक्टोबर प्रयन्त सेकशन 4 लावू जि एम बल्लारपूरचे आश्वासन* *शिवसेना जिल्हा प्रमुख संदिपभाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वात वेकोली कार्यालयात बैठक* *बबनभाऊ उरकुडे यांच्या प्रयत्नाला यश*


  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 9/25/2021 11:53:47 PM

चंद्रपुर (बल्लारपुर) :

गोवरी पोवणी एक्स्टेंशन आणि परिसरातील शेतकरी प्रकल्पग्रथांच्या अनेक समस्या घेऊन गेले दोन वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून वेकोली प्रशासनाला निवेदन देऊन काहीही कार्यवाही झाली नाही.
आज जिल्हा शिवसेनेचे नेतृत्व संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वात वेकोली बल्लारपूर क्षेत्रीय कार्यालय येथे बैठक घेतली असता वेकोली अधिकाऱ्यांना घाम फुटला.
येणाऱ्या महिन्याच्या 12 तारखेपर्यन्त जमिनीला सेकशन-4 लावू अशे आश्वासन वेकोली मार्फत देण्यात आले.
शिवसेनेच्या शिष्टमंडळात शिवसेना विधानसभा समन्वयक बबन उरकुडे,जिल्हा महिला संघटिका सरिताताई कुडे,गोवरी गावच्या महिला सरपंच्या सौ, आशा बबन ऊरकुडे, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर,शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे,पोवणी गावचे सरपंच पांडुरंग पोटे , स्वपनिल मोहुर्ले,स्वप्नील कासेकर, विनय धोबे, रोहित नलके यासंह पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News