ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

घनकचरा व्यवस्थापनाबाबत नगर पालिकेकडून कामचुकार ठेकेदारास पाठीशी घालण्याचा प्रयत्न.


  • YUNUS KHATIB (Pimpri Chinchwad )
  • Upadted: 12/1/2021 2:55:09 PM

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - शहरातील नागरिकांच्या आरोग्यप्रश्नी तथा घनकचरा व्यावस्थापन ढिसाळ कारभाराबाबतीत समाजवादी पार्टी तर्फे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार आणि कार्यकर्त्यांच्या वतीने नगर पालिका मुख्याध्याकाऱ्यांना निवेदन देण्यात आले,
या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, शहरात स्वच्छता रहावी याकरीता श्रीरामपूर नगर पालिकेमार्फत पुणे येथील मे.दिशा एजन्सी यांना शहरातील घनकचरा व्यवस्थापचा ठेका देण्यात आलेला आहे,

सदरील एजन्सीने शहरातील घनकचरा हा दैनंदिन तथा नियमितपणे साफ करावयाचा असून कामात कुठलीही कुचराई करावयाची नसून जर असे आढळून आल्यास सदरील एजन्सीवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार हा संबंधित नगर पालिका प्रशासनास आहे,

मात्र इतके नियम असताना सदरील एजन्सीने कामात कुचराई केलेली आहे, यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने समाजवादी पार्टीतर्फे श्रीरामपूर नगर पालिका प्रशासन आणि घनकचरा व्यवस्थापनाविरुद्ध दिनांक ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२१ असे सलग ५ दिवस आमरण उपोषण करुन शहरातील अस्वच्छतेबाबत संबधितांचे लक्ष वेधले असता संबंधित एजंन्सीने कामात कुचराई केली म्हणून नगर पालिका प्रशासनाकडून संबंधित एजन्सीला माहे सप्टेंबर २०२१ या केवळ एक महिन्याच्या कालावधीत कामात केलेल्या कसूराबाबत रुपये ७५०००/-  (अक्षरी रुपये पंचाहत्तर हजार मात्र) दंड ठोठावला आहे, ही बाब अभिनंदनीय आहे,

मात्र शहरातील अस्वच्छतेच्या गंभीर प्रश्नांमुळे सदरील नगर पालिका प्रशासनास तोंडी सांगुन तथा वेळोवेळी शेकडो निवेदने देऊन काहीच उपयोग झालेला नसल्याने समाजवादी पार्टीस शेवटी उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागला हे शहरवासियांचे दुर्दैवच म्हणावे लागेल,महत्वाचे म्हणजे सदरील एजन्सीला माहे सप्टेंबर २०२१ या केवळ एक महिना कामाच्या कुचराईबाबत दंड ठोठावण्यात आला आहे,हे जरी सत्य असले तरी संबंधित एजन्सीने शहरातील घनकचऱ्याचा ठेका घेतल्यापासूनच शहरातील स्वच्छतेकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केलेले आहे हे नाकारुन चालणार नाही,कारण शहरातील अस्वच्छतेबाबत शहरातील अनेक नागरीकांच्या तक्रारी होत्या व आहेत मग त्यांच्या तक्रारी नुसार संबंधित ठेकेदारास कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात आल्याचे दिसून येत नाही,आणि जर यामागे दंड आकारण्यात आला असेलतर त्याचाही खुलासाही करण्यात आलेला नाही, दुसरे असे की, शहरातील अस्वच्छतेबाबत जेव्हा समाजवादी पार्टीतर्फे सलग ५ दिवस आमरण उपोषण करण्यात आले तेव्हा कुठे श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाने मनावर घेत संबंधित एजंन्सीस ७५०००/- रुपयांचा दंड ठोठावला,

मात्र संबंधित एजंन्सीस ठोठावण्यात आलेला दंड हा कोणत्या तक्रारीच्या आधारे ठोठावला गेला ?, सदरील कामाबाबत श्रीरामपूर नगर पालिका कर्मचारी, अधिकारी प्रत्येक्ष शहरात जागो जागी फिरुन प्रत्येक्षात कोणी शहानिशा केली आहे काय ? कोणता रिपोर्ट दिला आहे ?, काय निष्कर्ष काढले आहे ?, की कार्यालयात बसुनच केवळ तक्रारीच्या आधारावर सदरील दंड ठोठावण्यात आला आहे ? याचाही खुलासा करण्यात आलेला नाही,सोबतच जर शहरातील घनकचऱ्याचा ठेका घेतल्यापासूनच संबंधित एजंन्सीने आपल्या कामांबाबत उदासिनता दाखवून आपले कामे आणि कर्तव्यात कसुर केलेला आहे,कारण त्याबाबत पुरावा म्हणून श्रीरामपूर नगर पालिका कार्यालयात नागरीकांच्या याबाबत शेकडो तक्रारी पडून आहेतच तर मग संबंधित एजंन्सीस केवळ माहे सप्टेंबर २०२१ या केवळ एकाच महिन्याचा दंड का आकारण्यात आला,दरमहिन्याचा दंड आकारणे का नगर पालिका प्रशासनास सुचले नाही ?, यामुळे सदरील नगर पालिका प्रशासन हे ठेकेदारास पाठीशी तर घालत नाही ना ? असा संशय बळावत आहे,वास्तविक पहाता संबंधित एजंन्सीने जर ठेका घेतल्या पासूनच कामात कसूर केलेला आहे तर दंड केवळ एकाच महिन्याचा का ?, 

हे अयोग्य आणी संबंधित एजंन्सीला पाठीशी घातले जात असल्याचे जाणवत आहे, श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाचा जर खरोखरच पारदर्शी कारभार आहे तर मग संबंधित एजंन्सीने ठेका घेतल्यापासून ते आजवर दर महिन्याला त्यांनी केलेल्या कामातील अनियमितता आणि कुचराईपोटी दंड आकारण्यात यायला हवा होता,मात्र असे निदर्शनास येत नाही असेही या निवेदनात म्हटले आहे,

तसेच संबंधित एजंन्सीने सदरील ठेका घेतल्यापासून ते आजवर केलेल्या कामातील अनियमितपणा आणी कुचराई पोटी प्रत्येक महिना दंड आकारणी करण्यात यावी, शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा ज्वलंत प्रश्न असल्याने यापुढे शहरातील अस्वच्छतेप्रश्नी संबंधित एजंन्सीस दक्षता बाळगण्याची सुचना देण्यात यावी आणि येत्या आठ दिवसांत याबाबत काय निर्णय घेण्यात आला,याची आम्हास माहिती देण्यात यावी.अन्यथा याविरोधात श्रीरामपूर नगर पालिका  कार्यालयासमोर आत्मकलेश आंदोलन आणि आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारला जाईल असेही निवेदनात शेवटी नमुद करण्यात आले आहे

या निवेदनावर जोएफ जमादार,आसिफ तांबोळी, अय्यूब पठान, अब्दुल सैय्यद, मतीन शेख,बादल सिंग जूनी, ईमरान शेख, अरबाज़ कुरैशी, मुबसशीर पठान, ज़करिया सैय्यद, अल्तमश शेख,अमन ईनामदार, फैजान सैय्यद,परवेज़ शेख,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share

Other News