मा. उपमहापौर प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ऑक्सिजन पार्कची आमदार सुधीरदादा गाडगीळ, जयश्रीताई पाटील, दिनकरतात्या पाटील यांच्याकडून पहाणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 17/12/2025 12:49 PM

सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक.०१ मधील माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले स्व.मदनभाऊ पाटील उद्यान ऑक्सिजन पार्कची भाजपा नेत्या श्रीमती.जयश्रीताई पाटील, माजी आमदार दिनकर तात्या पाटील आणि भाजपा प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्या समवेत पाहणी केली तसेच प्रभागातील सामाजिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कार्याबद्दल नाव लौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजपा सांगली जिल्हा शहर सरचिटणीस विश्वजीत पाटील, भाजपा सांगली शहर उपाध्यक्ष अतुल माने, शरद देशमुख, विजय साळुंखे, माजी नगरसेविका रोहिणीताई पाटील, पद्मश्री प्रशांत पाटील, कांचनताई कांबळे, संतोष पाटील, शेटजी मोहिते, मुस्तफा रंगरेज, ऋषिकेश सूर्यवंशी, रवींद्र सदामते, श्रीकांत वाघमोडे, अरविंद सकट, सौ.कोमलताई चव्हाण, मायाताई गडदे आदी विजेता सोशल ग्रुप, यशवंतनगर सदस्य आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या