जन् सुविधेची कामे जिल्हा परिषदेला न देता थेट ग्रामपंचायतींना द्या - आ. डॉ. देवराव होळी

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 18/01/2022 3:36 PM



जिल्हा वार्षिक  योजनेच्या बैठकीत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची मागणी

जिल्हा वार्षिक योजनेतून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय होण्याची गरज

स्थानिक आमदार व खासदार यांना विश्वासात घेतल्याशिवाय जनसुविधांची कामे करू नये अशी मागणी

पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेची आभासी पद्धतीने बैठक संपन्न

दिनांक १८ जानेवारी २०२२ गडचिरोली

जिल्हा परिषद अंतर्गत देण्यात येणारी जन सुविधेची कामे योग्य प्रकारे होत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने सदर कामे थेट ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात यावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव  होळी यांनी आभासी पद्धतीने झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीमध्ये केली

मागील एक वर्षापासून जिल्हा परिषद अंतर्गत जन सुविधांची कामे करताना केवळ वैयक्तिक स्वार्थ व वैयक्तिक राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सदर कामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले जात नाही . गडचिरोली जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या लोकप्रतिनिधींना विश्‍वासात न घेता  कामे   केली जातात. सदर कामे करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे. स्थानिक आमदार व खासदार यांना विश्वासात घेतल्याशिवाय जन सुविधांची कामे करण्यात येऊ नये अशीही मागणी या बैठकीच्या वेळी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी केली.

Share

Other News

ताज्या बातम्या