*मत्स्यपालन व्यवसायाच्या अंतर्गत रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधीबाबत समुपदेशन सत्राचे समारोप*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 01/07/2022 8:26 PM

गडचिरोली, दि.01: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली आणि मत्स्यव्यवसाय कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30.06.2022 रोजी वेळ  दूपारी 12.00 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्रमांक-2 युनिट क्र.2, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे मत्स्यव्यवसायाचे विविध क्षेत्रांत आधुनिक पध्दतीने विकास कसा करता येईल? या दृष्टीकोनातून “मत्स्यपालन व्यवसायाच्या अंतर्गत रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधीबाबत” समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले. 
सदर सत्राला अतुल महाजन, जिल्हा समन्वयक यांनी प्रास्ताविक केले. सत्राला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त, शुभम कोमरेवार हे लाभले व तसेच मत्स्यपालन व्यवसायाचे लाभार्थी मार्गदर्शक म्हणून पंकज राऊत तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त तसेच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गणेश चिमणकर, कार्यालयातील कर्मचारी वृंद व रोजगार / स्वयंरोजगार करण्यास इच्छुक असलेले उमेदवार उपस्थित होते.  
सदर सत्राला सहभागी झालेले सर्व उमेदवारांना मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त, शुभम कोमरेवार  व मत्स्यपालन व्यवसायाचे लाभार्थी पंकज राऊत यांनी “मत्स्यपालन व्यवसायाच्या अंतर्गत रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधी” या विषयाबाबत  मार्गदर्शन केले. सदर सत्राला एकुण 25 उमेदवारांचा सहभाग लाभला. असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.
******

Share

Other News

ताज्या बातम्या