धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मास दिनाचे अवचित्य साधून अवघ्या 14 वर्षाच्या भगूरच्या चि.अर्णव गणेश कुवर याने 90 किलोमीटरची सायकल राईड अवघ्या चार तासात पूर्ण करून धर्मवीर संभाजी महाराज यांना एक मानाचा मुजरा केला. ही राईड त्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य लाभलेल्या तळेगाव शहर येथील त्यांच्या बंगल्यापासून सकाळी आठ वाजता सुरुवात करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ असलेले तुळापूर येथील त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन परत दुपारी ठीक बारा वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव शहर येथील निवासस्थानी राईड संपन्न केली. या राईड साठी अर्णवला इंटरनॅशनल सायकलिस्ट, त्याचे वडील भगूर पुत्र गणेश देविदास कुवर यांचे मार्गदर्शन लाभले. ही राईड पूर्ण करत असताना त्याला मार्च महिन्यातील प्रचंड कडक उन्हाचा सामना करावा लागला, अशाही परिस्थितीत आणि पुण्याच्या ट्राफिक मधून मार्गक्रमण करीत अत्यंत सावधगिरीने ही सायकल राईड पूर्ण केली. या अगोदरही अर्णव ने वयाच्या दहाव्या वर्षी स्वातंत्र्यवीर भगूर पुत्र विनायक दामोदर सावरकर तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सायकल राईड केल्या आहे. अशा या कोवळ्या वयात महापुरुषांच्या कामगिरीची दखल घेऊन त्यांच्या आठवणी प्रति त्यांना मानवंदना दिल्याबद्दल समाजामध्ये त्याचे प्रचंड कौतुक केले जात आहे.