भगूरमध्ये ‘नमो उद्यान’ भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न!

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 19/03/2026 11:29 PM

भगूरमध्ये ‘नमो उद्यान’ भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न! 

भगूर नगर परिषदेतर्फे दशक्रिया विधी रोड परिसरात साकारण्यात येणाऱ्या ‘नमो उद्यान’ या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा देवळाली मतदार संघातील आमदार सौ सरोज ताई आहेर यांच्या हस्ते संपन्न झाला.
त्यांनी यावेळी सांगितले की
या उद्यानामुळे भगूर शहरातील नागरिकांना एक सुंदर, स्वच्छ आणि हिरवळयुक्त विरंगुळा स्थळ उपलब्ध होणार असून, शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे.
 नमो उद्यान करता शासनाकडून एक कोटी रुपये व इतर कामाकरता 60 लाख रुपये मंजूर झाल्याचे नगराध्यक्ष सौ प्रेरणा बळकवडे यांनी सांगितले यावेळी जेष्ठ नागरिक संघाचे दादासाहेब देशमुख स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उत्सव समितीचे रमेश पवार माजी नगराध्यक्ष गोरखनाथ बलकवडे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गवासी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर विधी युक्त भूमिपूजन करून मान्यवरांच्या हस्ते कुदळी मारण्यात आली

या प्रसंगी नगराध्यक्ष सौ. प्रेरणा बलकवडे, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे तानाजी करंजकर उपनगराध्यक्ष प्रसाद आडके नगरसेवक दीपक बलकवडे काकासाहेब देशमुख  विशाल बलकवडे श्री रमेश पवार शिवाजी करंजकर किशोर कुंडारिया. राष्ट्रवादीचे श्री तानाजी गायधनी. नगरपालिकेचे मुख्याधिकारी पटेल साहेब सर्व सन्माननीय नगरसेवक,  नगरपालिकेचे कर्मचारी .पक्ष पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत कापसे यांनी केले व आभार  दीपक बलकवडे यांनी मानले

Share

Other News

ताज्या बातम्या