ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

प्रवास निष्ठेचा , उध्दव ठाकरे साहेबांसाठी फ्लोरिडा ते मुंबई प्रवास !!!


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/1/2022 12:18:56 PMहॉटेल मॅनेजमेंट करून अमेरिकेत नोकरीसाठी गेलेला मिरा रोडचा अक्षय राणे हा कडवट शिवसैनिक. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानणारा, उद्धवसाहेबांवर श्रद्धा असणारा आणि मातोश्रीला पंढरी मानणारा मुलगा. शिवसेनेवर प्रेम करणारा अक्षय हा कालांतराने दुबईला, फ्रांस, रशिया, इटली आणि आता फ्लोरिडा अश्या विविध देशानं मध्ये गेला. जगात अनेक ठिकाणी फिरला, पण शिवसेना आणि ठाकरेंची ओढ नेहमी घट्ट राहिली. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर अक्षय प्रचंड अस्वस्थ होता. साता समुद्रा पार असूनही त्याचा लक्ष इकडे होते. मित्रांना तिथून फोन करून सांगायचा कि, शिवसेने सोबतच रहा, उद्धवसाहेबांना सोडू नका. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार हें समजताच त्याने फ्लोरिडा मध्ये त्याच्या मित्रांना मिठाई वाटली. मिठाई वाटून तो इतक्यावरच थांबला नाही, दसरा मेळाव्याला काहीपण करून मी जाणारच हि त्याची इच्छा होती आणि ती पूर्ण करण्यासाठी त्याने ऑफिस मध्ये भांडून सुट्टी घेतली आणि स्वखर्चाने ८० हजारांचे विमान तिकीट काढून फ्लोरिडा वरून थेट मुंबई गाठली. त्याला एका मित्राने विचारले, अरे तू दसरा मेळाव्यासाठी सुट्टी टाकून इतक्या लांब का आलास. तर तो म्हणाला, अरे कोविड ची भयानक परिस्थिती जगात सुरु असताना. अमेरिके सारख्या इतक्या प्रगतिशील देशात आम्ही हाहाकार उडालेला पाहिला आहे. तेव्हा माझा महाराष्ट्र, माझे कुटुंब, माझे मित्र यांना ज्या माणसाने आपल्या परिवारा सारखे सांभाळले, धीर दिला, संवाद साधला, काळजी घेतली त्या देवा समान माणसासोबत एक मराठी माणूस आणि महाराष्ट्र प्रेमी नागरिक म्हणून पाठिंबा द्यायला आलोय आणि एक मराठी माणूस म्हणून माझे कर्तव्य आहे. विशेष म्हणजे अक्षयने त्याच्या तिकडच्या मित्रांना दसऱ्या मेळाव्याचे केलेले वर्णन पाहून नेट म्हणून त्याचा तिकडचा मित्र अल्सएंड्रो सुद्धा मेळाव्याला येणार होता. परंतु काहीतरी पारिवारिक मेडिकल इमरजेंसी मुळे त्याला शक्य झाले नाही. पण फ्लोरिडा वरून त्याचे मित्र हा मेळावा पाहणार आहेत आणि नंतर अक्षय त्यांना इंग्रजीत भाषांतर करून सांगणार आहे. हे असें शिवसैनिक आहेत, प्रचंड प्रेम करणारे निस्वार्थी. हिच शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाची शक्ती आहे. पैशाने विकत घेतलेले स्वार्थासाठी सरड्यालाही लाजवतील असें रंग बदलणारे लाखो सापडतील. पण हें ओरिजिनल निष्ठेचे केमिकल फक्त कडवट शिवसैनिकांन मधेच आहे. खरं तर मातोश्रीवर जाऊन उद्धवसाहेबांचे चरणस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेण्याची त्याची मनापासून इच्छा आहे, पण त्याची ती इच्छा पूर्ण होईल न होईल माहित नाही. पण दसरा मेळाव्यात त्यांचे लांबून का होईना, दर्शन मात्र नक्कीच होईल यात दुमत नाही

Share

Other News