नांदेड :- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये पदवी प्रमाणपत्र मिळण्याकरिता विद्यार्थ्यांची वाढती गरज
लक्षात घेता विद्यापीठ प्रशासनाने रविवार, दि. २८ डिसेंबर, २०२५ रोजी परीक्षा विभाग आणि पदवी प्रमाणपत्र वाटपासाठी दीक्षांत विभाग नियमितपणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या दिवशी विद्यापीठाच्या परीक्षा विभागामार्फत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण सुरू राहणार आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी दिली. विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी व प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.