नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे दि.२६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता *"वीर बाल"* यांच्या बलिदान दिवसा निमित्त महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत,स्थायी सभागृह कक्ष येथे *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या हस्ते वीर बालकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.
वीर बाल दिवस हा दरवर्षी २६ डिसेंबर रोजी शिखांचे दहावे गुरु "गुरु गोविंद सिंग" यांच्या दोन लहान पुत्रांच्या, साहेबजादा जोरावर सिंग आणि साहेबजादा फतेह सिंग यांच्या, धर्मासाठी दिलेल्या अतुलनीय बलिदानाची आठवण म्हणून साजरा केला जातो. या साहिबजाद्यांनी मुघलांच्या अत्याचारासमोर आपला धर्म सोडण्यास नकार दिला आणि हसत हसत हौतात्म्य पत्करले.
यावेळी उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, प्रकल्प संचालक अशोक सुर्यवंशी, कार्यालय अधिक्षक पद्माकर कावळे, वरिष्ठ लिपिक दत्तात्रय गोरपल्ले, सतपालसिंघ कोल्हापुरे यांच्यासह मनपाचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.