महापालिकेत “डॉ.भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख” यांना अभिवादन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 27/12/2025 7:43 PM

नांदेड :- महापालिकेत दि.२७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.००  वाजता मुख्य प्रशासकीय इमारत,स्थायी सभागृह कक्ष, येथे   *“डॉ.भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख"* यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस *मनपा सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक* यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  

डॉ.भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख हे भारतातील एक महान कृषीमंत्री, शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक होते, ज्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला, श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली, आणि 'भारत कृषक समाज' स्थापन करून कृषी क्रांती घडवली, तसेच 'महाराष्ट्र केसरी' वृत्तपत्र सुरू केले, ज्यामुळे त्यांना 'कृषक क्रांतीचे जनक' म्हणून ओळखले जाते. 

यावेळी उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, स्विय सहाय्यक आनंदा खानसोळे, वरिष्ठ लिपिक शंकर पतंगे, शुभांगी चौधरी, अश्विनी कुरुडे, विशाल जोंधळे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share

Other News

ताज्या बातम्या