भगूरला आमदार सरोज अहिरे व नगराध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे यांच्याकडून स्मशानभूमीची पाहणी सुसज्ज अद्यावत स्मशानभूमी होणार आमदार सरोज अहिरे निकालानंतर पाचव्याच दिवशी केली करायच्या कामांची पाहणी
भगूर वार्ताहर :- नुकतीच भगूर नगरपरिषदेची निवडणूक झाली आहे आणि २१ डिसेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागला त्यात भगूर शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप व उबाठा या आघाडीला भगूरच्या मतदारांनी भरभरून मतदान केले व नगराध्यक्षपदी प्रेरणा बलकवडे व ११ नगरसेवक निवडून आले.काल निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पाचव्याच दिवशी देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे, नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे व सर्व नगरसेवकांनी स्मशानभूमीची पाहणी केली आणि भगूरकरांसाठी सुसज्ज अद्यावत अशी सुशोभिनीय स्मशानभूमी वर्षभरात उभारली जाणार आहे.यासह भगूर शहरातील दोन ठिकाणच्या बौद्धविहार येथेही पाहणी करून बौद्ध विहार दुरुस्त करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.यावेळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर,नगरसेवक विशाल बलकवडे,दिपक बलकवडे,काकासाहेब देशमुख,प्रसाद आडके,बबलू जाधव,अजय वाहने,अमोल इंदारखे, नगरसेविका जयश्री देशमुख,सुजाता शिरसाठ,अश्विनी भवार,लता थापेकर आदी सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी व नागरिक यांनी आमदार सरोज अहिरे यांच्यासोबत शहरातील विविध विकासकामन बाबत चर्चा केली.यावेळी किशोर कुंडारिया,पंकज शेलार,संदीप कुंडारिया,विशाल शिरसाट, सुमित चव्हाण,प्रवीण लकरिया,संतोष सोनवणे, अशोक बिरछे,राहुल कुंडारिया, साईनाथ पढोरे,सुनील लकारिया,अमोल मोजाड, यासह प्रशासकीय अधिकारी अंजली मराडे,सिद्धेश मुळे, सोमनाथ देवकाते,शशांक तिवडे,विशाल हांडोरे आदींसह भगूर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगूरकरांनी विकासाच्या मुद्द्यावर आघाडीच्या हातात सत्ता दिली आहे आणि भगूरच्या जनतेला दिलेल्या वचनानुसार भगूर शहराची वाटचाल विकासाच्या दृष्टीने सुरू झाली आहे आज स्मशानभूमीची पूर्ण पाहणी करून शासनाच्या माध्यमातून दीड ते दोन कोटी रुपये उपलब्ध करून वर्षभरात सुसज्ज अद्यावत अशी स्मशानभूमी भगूरकरांसाठी उपलब्ध करून देईन
सरोज अहिरे
आमदार देवळाली विधानसभा
भगूरच्या माझ्या सुज्ञ मतदारांनी मला भरभरून मतदान केले भगूरकरांना विकासाचा दिलेला शब्द नक्कीच पूर्ण करीन भगूरकरांची प्रमुख मागणी असलेली स्मशानभूमीची पाहणी करून सुसज्ज अद्यावत अशा स्मशानभूमीची निर्मिती करणे हे प्रमुख काम आमदार सरोज अहिरे यांच्या माध्यमातून होणार आहे.भगूर शहराच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील
प्रेरणा बलकवडे
नगराध्यक्षा भगूर नगरपरिषद