नांदेड : राधाई अर्बन को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीने दिनदर्शिकेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासली असून भविष्यात आणखी चांगली दिनदर्शिका प्रकाशित करुन सामाजिक बांधिलकी जोपासावी असे मत सुप्रसिद्ध साहित्यिक लेखक विचारवंत, परखड वक्ते, पत्रकार आणि सामाजिक/ राजकीय नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी व्यक्त केले.
राधाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड नांदेड तर्फे २०२६ दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रा. डॉ. अनंत राऊत हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, भारतीय समाज फार विसरभोळा आहे म्हणून मान्यवर कांशीराम जी यांनी "कहीं हम भूल ना जाये" हे अभियान देशात राबविले. ज्या महामानवांनी आमचा उद्धार केला त्यांचा आम्हाला विसर पडता कामा नये, त्यांचे फोटो दिनदर्शिकेवर ठळकपणे छापले तर त्याकडे पाहून आपणाला महामानवांची आणि त्यांच्या परिवर्तनवादी विचारांची सतत आठवण होत राहिल. राधाई अर्बनने आर्थिक क्रांती तर केलीच आहे पण दिनदर्शिकेवर महामानवांची स्मृती जोपासण्याचे काम देखील ते करीत आहेत.
यावेळी पतसंस्था फेडरेशनचे सरचिटणीस संभाजी सुर्यवंशी, आहारतज्ञ डॉ. राजकुमार मोरे यांनीही आपले विचार मांडले. सामाजिक कार्यकर्त्या मंगल दुधम्बे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शंकरपुरे, साहेबराव जाधव, सेवानिवृत्त तहसीलदार यादवराव देगलूरकर, संभाजीराव कांबळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम राधाईचे संचालक रोहिदास सुर्यवंशी , ओंकार सुर्यवंशी यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राधाईचे मार्गदर्शक नरसिंग सुर्यवंशी यांनी केले. व्यवस्थापक किशोर सुर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले.
यावेळी अशोक लाठकर, रामचंद्र असोरे, हणमंत उतकर सगरोळीकर, रमेश दुधम्बे, संजय सोनटक्के, गजानन देगलूरकर, नामदेव साखरे, बजरंग खंदारे, प्रदीप सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती. शेवटी विभागीय अधिकारी आकाश खानसोळे यांनी आभार मानले व अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.