वंचित घटकातील  व्यक्ती आज राष्ट्रपतीपदावर विराजमान  होऊ शकतात याचे श्रेय भारतीय संविधानाला जाते.- प्रा.व्ही.आर.बगाव

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 26/11/2022 8:48 PM

वंचित घटकातील  व्यक्ती आज राष्ट्रपतीपदावर विराजमान  होऊ शकतात याचे श्रेय भारतीय संविधानाला जाते.- प्रा.व्ही.आर.बगाव
   शिक्षण मंडळ भगूर संचालित,इ.एस.एस. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय  या ठिकाणी संविधान  दिन साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संविधान ग्रंथाच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. तसेच26/11  च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
 यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इतिहास विभाग प्रमुख प्रा.व्ही.आर.बगाव  म्हणाले की, समाजातील सर्व वंचित घटकांना, कामगारांना, स्त्रियांना,  वृद्धांना,लहान बालकांना अशा प्रत्येकालाच संविधानामुळे विविध प्रकारचे हक्क आणि अधिकार प्राप्त झाले. समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम संविधानाने केले.  याचे संपूर्ण श्रेय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य  समीर महाले म्हणाले की, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, स्वच्छता राखणे यासारख्या छोट्या गोष्टींमधून देखील आपण देशाप्रती  व संविधानाप्रती आपला आदर व्यक्त करू शकतो. कार्यक्रमाच्या शेवटी मराठी विभाग प्रमुख प्रा. मृत्युंजय कापसे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा.गायत्री हरळे तर आभार प्रदर्शन प्रा. पुनम मगर यांनी केले.

Share

Other News

ताज्या बातम्या