*अन्याय,अत्याचार,भ्रष्टाच्यार विरोधी समिती जिल्हा उपाध्यक्ष रोशन कवाडकर यांच्या प्रयत्नात यश* *अखेर तीन कोटी धान घोटाळा मुरूमगाव पोलिसांनी केली कारवाई*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 28/11/2022 11:55 AM

धानोरा :-
         तालुक्यातील मुरूमगाव धान खरेदी केंद्रावर तीन कोटींचा दान घोटाळा उघडकीस आला आहे या प्रकरणात दोन आरोपींना मुरूमगाव पोलीसांनी अटक केली आहे केंद्रप्रमुख गुरुदास धारणे  (34) रा. मुरूमगाव याला 25 नोव्हेंबर रोजी व विपणन निरीक्षक राहुल नानाजी कोकडे (37) रा.किनवट जि.नांदेड याला 26 नोव्हेंबर रोजी धानोरा येथून अटक करण्यात आली धारणे यांना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठारी सुनावली आहे तर कोकोडे यांना रविवार न्यायालयात नजर केले जाणार आहे मुरूमगाव धान खरेदी केंद्रावर 2021- 22मध्ये खरीप हंगामाचे 9 हजार 878 क्विंटल धान गोदामात शिल्लक नसल्याने आढळून आले यानंतर संस्थेचे व्यवस्थापक एल.जी.धारणे उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज चौधरी, प्रतवारीकार तथा प्रभारी विपणन निरीक्षक राहुल कोकडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती मात्र समाधानकारक खुलासा न दिल्याने उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज चौधरी आणि विपणन निरीक्षक राहुल कोकडे यांना निलंबित करण्यात आले होते या प्रकरणाची तपास अधिकारी कूरखेड्याचे उपप्रादेशिक व्यवस्थापक बावणे यांनी 18 ऑगस्ट रोजी मुरूम गाव येथील पोलीसात तक्रार दाखल केली त्यावरून केंद्र व्यवस्थापक एल.जी.धारणे, केंद्रप्रमुख गुरुदेव धारणे, शंकर कुंभरे, राहुल कोकडे व अज्ञात व्यापारी यांच्या विरोधात 31 आगस्ट रोजी भानंवि 420,406,409,34 या कलमांतर्गत गुन्हादाखल करण्यात आला त्यानंतर केंद्रप्रमुख गुरुदास धारणे याला अटक करण्यात आली. या प्रकरणात गुन्हा दाखल असलेला व्यवस्थापक मात्र फरार आहे.अधिक तपास मुरूम गाव पोलीस मदत केंद्राचे तपास अधिकारी जी.एस.आठवे करीत आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या