ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

नवी मुंबई:सामन्यांचे प्रवासात मेगा हाल..!!


  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 8/4/2020 12:49:38 AM

वाशी प्रतिनिधि,श्री मल्हारी घाडगे,
वाशी रेल्वे स्टेशन बाहेर बस थांब्यावर प्रवाशांना घरी परतताना मोठ्या हाल आपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारने जून महिन्यात लाॅकडाऊन कालावधी शिथील करून सध्या तरी रेल्वेतून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची परवानगी दिली आहे.तर बेस्ट सह  मुंबई लगतच्या शहरातून ३५ प्रवासी मर्यादा ठेवून बस प्रवास करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे लाखो नागरिक घराबाहेर कामानिमित्त पडत आहेत. त्या प्रमाणात बस मार्ग परिवर्तन संख्या खूपच तुटपुंजी आहे. गर्दी वाढत असल्याने सोशल डिस्टंन्सिंगचा फज्ज्या उडून कोरोनाचा प्रार्दुभाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गरज आहे ती बेस्ट सह अन्य वाहतूक व्यवस्थांनी बस फेऱ्यांत वाढ करण्याची तसेच रेल्वेने देखील फास्ट सह धीम्या गतीने लोकल चालवून प्रत्येक रेल्वे स्टेशनवर ती थांबवून प्रवाशांना दिलासा देण्याची.सरकार गंभीरपणे याकडे लक्ष देवून कारवाई करील काय...?.

Share

Other News