काळ्या खणीतील दुर्गंधीयुक्त पाण्याचे शुद्धीकरण न केल्यास आंदोलन : मनोज भिसे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 19/02/2024 7:04 PM


सांगली प्रतिनिधी 
                  *सांगली नगरीतील ऐतिहासिक काळ्या खणीमध्ये  असणारे पाणी हे दूषित झाले असून ,त्याचा रंग हिरवा पडू लागला आहे.त्याची दुर्गंधी येऊ लागली आहे.दिवसभर उन्हामुळे दुर्गंधी जाणवत नाही परंतु सायंकाळच्या वेळी सदर पाण्याची दुर्गंधी सुटते.यामुळे परिसरातील नागरिकांना शिवाय येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे*.
      *नुकतेच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने सदर खणिच्या सुशोभीकरणासाठी कोट्यावधी रुपये खर्च केलेत .त्या ऐवजी सुरुवातीला पाण्याचे शुद्धीकरण करण्याची यंत्रणा राबवणे आवश्यक होते. तसे न करता ठेकेदारांना पोसण्यासाठीच हे सुशोभीकरण करण्यात आल्याचे जाणवत आहे.सुशोभीकरणासाठी वापरले गेलेले कोट्यावधी रूपये काळ्या खनिच्या अशुद्ध पाण्यात बुडाले असेच समजावे का?* 
     *अशा तऱ्हेने पाण्याची दुर्गंधी येत असेल तर या सुशोभिकरणाला काहीच अर्थ उरत नाही .कारण दुर्गंधी येत असेल तर तिथे कोणीच नागरिक फिरण्यासाठी अथवा बोटिंग साठी येऊच शकत नाहीत .त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने काळ्या खणीकडे लक्ष घालून,लवकरात लवकर या पाण्याचे  शुद्धीकरण करावे आणि खणीमधील कचरा साफ करावा.अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने करण्यात येत आहे.अन्यथा सांगलीकर नागरिकांना घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा लोकहित मंचच्या वतीने आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांना दिलेल्या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे .यावेळी सुनिल शिंदे, आदित्य आवळे, अमोल भिसे हितेश राक्षे  आणि लोकहीत मंच चे पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या