1974 रोजी झाले होते महागाई विरोधी आंदोलन , गोळीबारातील हुतात्म्यांना श्रद्धांजली..

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 02/01/2026 1:14 PM

1974 साली झालेल्या वणी गोळीबारातील हुतात्म्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व नातेवाईकांकडून श्रद्धांजली
2 जानेवारी 1974 रोजी झाले होते महागाई विरोधी आंदोलन
_______________________
प्रतिनिधी इरफान शेख ; वणी : आजपासून ५२ वर्षापूर्वी २ जानेवारी १९७४ रोजी वणी येथे महागाई चे विरोधात महागाई विरोधी  कृती समितीचे वतीने राज्यव्यापी आंदोलन अंतर्गत नवीन वर्षाचा दुसऱ्याच दिवशी आंदोलन आणि त्याच दिवशी गोळीबार आणि निष्पाप ७ लोकांचा बळी! ही घटना वणीचा इतिहासातील सर्वाधिक भयंकर घटना म्हणून मानल्या जाते.  ह्याच घटनेतील हुतात्म्यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने आणि हुतात्म्यांचा नातेवाईकांच्या वतीने  दिनांक २ जानेवारीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
   सन १९७४ साली इंदिरा गांधी यांच्या सत्तेचा काळात निर्माण झालेल्या महागाई मुळे महाराष्ट्रात महागाई चे विरोधात राज्यव्यापी आंदोलन कृती समितीचे वतीने करण्याचे ठरविण्यात आले होते.  वणी येथे सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व अन्य पुरोगामी संघटनांच्या वतीने २ जानेवारी १९७४ ला आंदोलन करण्याचे ठरले. सरकारचा विरोधात आंदोलन असल्याने वणी पोलिसांकडून कृती समितीतील कॉ शंकरराव दानव व इतर नेत्यांना एक दिवसाआधीच अटक केली. २ जानेवारीला जसे जनतेला कळले, जनता चवताळून मोठ्या प्रमाणावर जमा होऊन आंदोलनात सहभागी झाली.  परिणामी काही असंतुष्ट लोकांनी जाळपोळ सुरू केल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न निष्फळ झाल्याने पोलिसांनी अंधाधुंद गोळीबार करून निष्पाप राजेश चिंडलिया १७ वर्ष, भास्कर मांडवकर २२ वर्ष, वासुदेव वाघ २२ वर्ष, कवडू सुतसोनकर २५ वर्ष, पुणाजी गिरडे ५९ वर्षे, रामकृष्ण झिलपे ६० वर्ष, दौलत पुंड या सात लोकांचा बळी घेतला, अनेक जण जखमी झाले.  ह्या घटनेने वणीत अनेक जण हादरून गेले. 
  ह्या वणीतील टिळक चौकात झालेल्या गोळीबाराचा घटनेत झालेल्या हुतात्म्यांचा दरवर्षी २ जानेवारी ह्या दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आंदोलनातील नेते कॉ शंकरराव दानव श्रद्धांजली वाहत आलेले आहेत.  त्याचा पश्चात  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.  ॲड कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे राज्य कमिटी सदस्य कॉ ॲड दिलीप परचाके, कॉ सरिता दानव, कॉ विष्णू दानव, त्याचप्रमाणे हुतात्म्यांचे नातेवाईक मारोती पुंड, संजय सुतसोणकर, मारोती गिरडे आणि अन्य बाबाराव गेडाम, आसिफ शेख, नारायण पेंटर आदी प्रामुख्याने उपस्थित राहून २मिनिटे मौन राखून मेणबत्ती प्रज्वलित करून, पुष्पहार अर्पण करून तसेच महागाई विरोधात आणि हुतात्म्यांना सलाम करीत नारेबाजी करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

Share

Other News

ताज्या बातम्या