सांगलीत भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्या चे लचके तोडले मात्र प्रशासन निवडणुकीत व्यस्त व मस्त...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 02/01/2026 11:14 AM

गुरुवार दिनांक १/१/२०२६ रोजी व्यंकटेश नगर सांगली येथे संध्याकाळी ५ वाजता भटक्या कुत्र्याच्या भयानक हल्ल्यात अवघ्या ४ वर्षाचे बाळ (ध्रुव गोपाळ लड्डा) गंभीर जखमी झाले.

कुत्र्याने बाळाला आडवे पाडून चेहऱ्याचे लचके तोडले. रक्तबंबाळ अवस्थेत त्याच्या आजोबांनी त्याला एका खाजगी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आहे.

एका बाजूला लोकशाही बळकट करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत मात्र लोकशाही जिवंत ठेवनाऱ्या नागरिकांच्या जीवन मरणाची परिस्थिती निर्माण झाली आहे ह्याला जबाबदार कोण 
इच्छुक उमेदवार आणि त्यांचे नेते निवडणुकीत व्यस्त प्रशासन मतदार जागृती मध्ये व्यस्त जनता मरण यातना सोसत आहे 
सुज्ञ नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालावा का म्हणून विचार करत आहेत 
मतदानावर बहिष्कार घालून विशेष संपणार नाहीत मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होणार नाहीत हे पण तितकेच खरे आहे
या बाबतीत काय कार्यवाही करता येईल या बाबत माहितगार व्यक्तींनी मार्गदर्शन करावे अशी विनंती आहे 

सतीश साखळकर 
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा 

Share

Other News

ताज्या बातम्या