.सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २५-२६ च्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारांची पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. सार्वत्रिक निवडणुकीसाठीची रणनीती, प्रचाराची दिशा, संघटनात्मक बांधणी व जनतेशी थेट संवाद याबाबत सविस्तर चर्चा करत उमेदवारांशी संवाद साधला.
या बैठकीत पक्षाची ध्येयधोरणे, विकासाभिमुख विचारसरणी आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर ठामपणे उभे राहून एकसंघ, शिस्तबद्ध व प्रभावी निवडणूक लढवण्याचा संकल्प केला तसेच सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!!
यावेळी मिरज विधानसभा मतदारसंघ आमदार, माजी मंत्री सुरेश भाऊ खाडे, भाजपा संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, नितीनराजे शिंदे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, प्रदेश कार्यकारणी सदस्या नीताताई केळकर, दीपक बाबा शिंदे-म्हैशाळकर, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपा जैन प्रकोष्ट प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष स्वातीताई खाडे, भाजपा नेत्या जयश्रीताई पाटील, भाजपा नेते पृथ्वीराज पाटील, सर्व भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार, भाजपा पदाधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधी मान्यवर उपस्थित होते.