सांगली प्रतिनिधी
31 डिसेंबर रोजी दारू न पिता तरुण पिढीने दूध प्यावे व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी राम मंदिर चौकात लोकहित मंचच्या वतीने दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. सदर उपक्रमास सांगलीकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील विविध समस्या आणि घडामोडींवर आवाज उठवणारी संघटना म्हणून नावारूपास आलेल्या लोकहित मंच या संघटनेच्या वतीने दरवर्षी, तरुण पिढी सुधारावी, तरुण पिढीने व्यसनाच्या आहारी जाऊ नये हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून, 31 डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणामध्ये दारू पिण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून, "दारू नको दूध प्या" हा अनोखा उपक्रम गेल्या 21 वर्षांपासून राबवण्यात येतोय.
या उपक्रमाचे हे 22 वे वर्ष असून, याही वर्षी सांगलीतील राम मंदिर चौकामध्ये सायंकाळी हा उपक्रम राबवण्यात आला. सदर उपक्रमाचा शुभारंभ सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी सतीश शिंदे, लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे, उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, समर्थ व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष रवींद्र कांबळे, पोपट कांबळे, मिलिंद कांबळे, रोहित आरगे, चेतन गाडे, नवाज शेख, शितल घारगे, निखिल कोळपे, सिद्धार्थ घाडगे आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.