आजाराचे वेळेत निदान झाल्यास उपचार शक्य -डॉ.मुजाहीद खान

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 01/01/2026 7:54 PM

नांदेड :- शहरापासून जवळच असलेल्या बळीरामपूर येथे नववर्षा निमित्त नांदेड क्रिटीकल केअर हॉस्पीटलच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरास शेकडो रूग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी रूग्णांना समुपदेशन करतांना डॉ.मुजाहीद खान म्हणाले काही रोगाचे वेळेत निदान झाल्यास उपचार होवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्यावे असे आवाहन केले.
नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. बळीरामपूर येथे दि.1 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता नांदेड क्रिटीकल केअर हॉस्पीटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या कार्यक्रमास रूग्णालयाचे डॉ.मुजाहीद खान, डॉ.अहतेशाम कुरेशी, डॉ.बनसोडे, माजी सरपंच इंद्रजीत पांचाळ, माजी सरपंच तथा ग्रा.प.सदस्य नागोराव आंबटवार, उपसरपंच नागेश वाघमारे, ग्रा.प.सदस्य अशोक वाघमारे, रवि भंडारे, भारतबाई दासरवाड, सामाजिक कार्यकर्ते संभाजी आढाव, साहेबराव चित्ते, संतोष सुर्यवंशी, महाराष्ट्र पोलीस राजेश दासरवाड, माधव गायकवाड, भाजपचे माधव उमरजकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ.मुजाहीद खन यांनी रूग्णांची तपासणी करत निरोगी राहण्यासाठी रूग्णांसोबत चर्चा करत म्हणाले काही रोगांचे निदान वेळेत झाल्यास त्यावर उपचार करता येतात. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे असे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक पत्रकार सुरेश आंबटवार, शिवाभाऊ दासरवाड, रामचंद्र बाबळे, गोविंद गायकवाड, अजय सुर्यवंशी, राहुल बाबळे, रवी दासरवाड, भानुदास शिंदे, पवन सुर्यवंशी, सौरव बाबळे यांच्यासह आदिंनी प्रयत्न केले.

Share

Other News

ताज्या बातम्या