विजय नगर भागातील ड्रेनेजसाठी खोदलेल्या रस्याचे त्वरीत रोड रिस्टोरेशन करावे, समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष नितिन मिरजकर यांची निवेदनाद्वारे मागणी...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/05/2024 10:15 PM

वॉर्ड क्रमांक 8 व विजयनगर भागातील ड्रेनेज साठी खोदलेला रस्त्याचे त्वरित रोड रिस्टोरेशन करावे यासाठी समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नितीन मिरजकर यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. आडसुळ साहेब यांना निदान देण्यात आले.

जानेवारी  महिन्या पासून कुपवाड ड्रेनेज योजनेचे काम सुरू असून या कामासाठी वॉर्ड क्रमांक ८ मधील विद्यानगर , गंगानगर , विजयनगर , विनायक नगर , अष्विनायकनगर भागात डांबरी तसेच नवीन करण्यात आलेले रस्ते खोदून हे काम करण्यात आले आहे.. जयंती सुपर गुजरात या कंपनीकडे या कामाचा ठेका असून काम निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याबाबत तसेच ट्रेंच व्यवस्थित भरला जात नाही व खड्डे भरले जात नाही यामुळे अपघात होत आहेत. याकरिता दिनांक ८ फेब्रुवारी रोजी तत्कालीन आयुक्त श्री. सुनील पवार यांना समाजवादी पार्टी तर्फे निवेदन दिले होते.
यावेळी समाजवादी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नितीन मिरजकर म्हणाले, वास्तविक हे काम जानेवारी महिन्यामध्ये सुरू झाले आहे पण तरीही रोड रिस्टोरेशनचे काम अजून सुरू करण्यात आले नाही. विजयनगर पूर्व व पश्चिम भागातील खासकरून राजहंस सोसायटी, के एन पी सोसायटी , डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटी , कर्मवीर भाऊराव सोसायटी , शिल्प चिंतामणी सोसायटी , आश्रय सोसायटी , दयानंद सोसायटी येथे ड्रेनेज चे काम झाले आहे. तिथे डांबरी रस्त्यावर खुदाई करण्यात आली असून अजून तिथे माती बाजूला सारण्याचे तसेच रोड रिस्टो रेशनचे काम झाले नाही. हे काम पावसाळ्यापूर्वी व्हायला पाहिजे होते पण अद्याप झाले नाही. तरी रस्ता भरायचे व माती बाजूला काढून घेण्याचे काम येत्या 5 दिवसात पूर्ण व्हावे तसेच महापालिका प्रशासनाचे या कंत्राटदारवर अंकुश नाही असेही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. आडसुळ साहेब यांना निवेदन देऊन सांगण्यात आले.
जर काम लवकर पूर्ण झाले नाही तर समाजवादी पार्टी तर्फे जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला.
यावेळी समाजवादी पार्टीचे शहर अध्यक्ष डॉ. प्रमोद दीप , श्री. चंद्रशेखर पाटील, श्री. प्रकाश वाघमारे , श्री. राजशेखर पाटील , समाजवादी पार्टीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री.सुहास आवटे उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या